Yuvraj Singh : ‘माझ्या वडिलांना मानसिक आजार,’ युवराजचा जुना व्हीडिओ व्हायरल

युवराजचे वडील योगराज यांनी अलीकडे कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर जहरी टीका केली होती.

70
Yuvraj Singh : ‘माझ्या वडिलांना मानसिक आजार,’ युवराजचा जुना व्हीडिओ व्हायरल
Yuvraj Singh : ‘माझ्या वडिलांना मानसिक आजार,’ युवराजचा जुना व्हीडिओ व्हायरल
  • ऋजुता लुकतुके

युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी अलीकडेच एक वादळी मुलाखत देताना कपिल देव आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यावर जहरी वैयक्तिक टीका केली होती. कपिल देवने खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द घडू दिली नाही. तसंच महेंद्र सिंग धोनीने युवराज सिंगचा भारतीय संघातून पत्ता कट केला, असा त्यांचा आरोप होता. आणि यासाठी ते दोघांनाही माफ करणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर आता योगराज यांचा मुलगा युवराज सिंगचा (Yuvraj Singh) जुना व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यात आपल्या वडिलांची मानसिक अवस्था ठिक नसल्याचं भाष्य युवराज करताना दिसतो.

२०११ च्या विश्वचषकाचा नायक युवराज सिंग (Yuvraj Singh) युट्युब पॉडकास्टमध्ये म्हणाला होता – माझ्या वडिलांना मानसिक समस्या आहे, पण त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना उपचारांची गरज आहे हे ते मान्य करणार नाहीत. मला असे वाटते की त्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पण, त्यांनीच ही गोष्ट स्वीकारायला हवी.

(हेही वाचा – BMC : पदपथावरील फेरीवाल्यांवर कारवाईचे निर्देश, पण बैठकीचे इतिवृत्तांतच उपलब्ध नाही!)

भारतासाठी एक कसोटी आणि ६ एकदिवसीय सामने खेळलेल्या योगराज यांनी दोन दिवसांपूर्वी यूट्यूब चॅनल झी स्विचला सांगितले – मी माझ्या आयुष्यात धोनीला कधीही माफ करणार नाही. त्याने त्याचा चेहरा आरशात बघितला पाहिजे. तो महान क्रिकेटर आहे, पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध काय केले हे समोर येत आहे. त्याला आयुष्यात कधीच माफ करता येणार नाही. मी आयुष्यात कधीच दोन गोष्टी केल्या नाहीत, पहिली, ज्याने माझ्यावर अन्याय केला असेल त्याला मी कधीच माफ केले नाही आणि दुसरी, मी आयुष्यात त्यांना कधीच स्वीकारले नाही, मग ते माझे कुटुंबीय असोत किंवा माझी मुले.’

याच मुलाखतीत योगराज सिंह (Yograj Singh) यांनी १९८३ चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देववरही भाष्य केले होते. १९८१ मध्ये भारतीय संघातून वगळण्यात आल्यापासून कपिल देव यांच्यासोबतचे त्यांचे संबंध ताणले गेल्याचा दावा त्यांनी केला. कपिल यांनी त्यांना आपला प्रतिस्पर्धी मानून संघातून वगळले होते, असे योगराज यांचे मत आहे.

(हेही वाचा – Uddhav Thackeray: ‘शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली’; असं कोण म्हणालं?)

योगराज सिंह (Yograj Singh) म्हणाले, ‘मला आयुष्यात लोकांना दाखवायचे आहे की योगराज काय आहे, ज्याला तुम्ही खाली आणले आहे. आज संपूर्ण जग माझ्या चरणी आहे, सलाम करत आहे आणि ज्यांनी खूप वाईट कृत्ये केली होती… त्यांपैकी काहींना कर्करोग झाला आहे, काहींचे घर गेले, आणि काहींच्या घरी मूल नाही. मी कोणाबद्दल बोलतोय ते तुम्हाला समजलेच असेल… तो तुमचा आजवरचा सर्वात महान कर्णधार कपिल देव आहे, मी त्यांना म्हटले होते की मी तुझे असे हाल करेन की जग तुझ्यावर थुंकेल. आज युवराज सिंगकडे (Yuvraj Singh) १३ ट्रॉफी आहेत आणि तुझ्याकडे फक्त एक वर्ल्ड कप आहे.

यापूर्वीही योगराज यांनी अनेकदा आपल्या मुलाखतींमधून महेंद्रसिंग धोनीवर टीका केली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.