युवकांना जिहादसाठी चिथावणी देणाऱ्या Zakir Naik ला पाकिस्तानने घातल्या पायघड्या

51
युवकांना जिहादसाठी चिथावणी देणाऱ्या Zakir Naik ला पाकिस्तानने घातल्या पायघड्या
युवकांना जिहादसाठी चिथावणी देणाऱ्या Zakir Naik ला पाकिस्तानने घातल्या पायघड्या

आपल्या भाषणांतून मुसलमानांना जिहाद करण्यासाठी चिथावणी देण्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल असलेला आणि UAPA अंतर्गत मनी लाँड्रिंग प्रकरणी पोलिसांच्या रडारवर असलेला नेहमीच चर्चेत राहणारा इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक याला पाकिस्तानने निमंत्रण दिले आहे. चिथावणीखोर भाषणे केल्याच्या प्रकरणी भारतात गुन्हा दाखल झाल्यानंतर झाकीर नाईकने मलेशियात पलायन केले होते. आता पाकिस्तानकडून मिळालेल्या निमंत्रणाची माहिती खुद्द झाकीर नाईकनेच (Zakir Naik) दिली आहे. एका टॉक शो साठी पाकिस्तानात प्रमुख पाहुणा म्हणून झाकीर नाईकला आमंत्रित करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Senate Election 2024 : मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका; मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीवरील स्थगिती उठवली)

पाकिस्तानात तीन ठिकाणी कार्यक्रम

झाकीर नाईक आणि त्याचा मुलगा पाकिस्तानच्या तीन शहरांमध्ये भाषण करणार आहेत. ते दोघे ५-६ ऑक्टोबरला कराचीमध्ये, १२-१३ ऑक्टोबरला लाहोरमध्ये आणि १९-२० ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी जनतेला संबोधित करतील, असे पोस्टर झाकीर नाईकने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित केले आहे.

स्वतःच मान्य केली दहशतवादी प्रवृत्ती

भारतात झालेल्या आरोपांमुळे आणि अटकेच्या भीतीमुळे झाकीर नाईक २०१६ मध्ये भारतातून मलेशियाला गेला होता. नाईक भारतात परतण्याबाबत कुत्सितपणे बोलला की, भारतात जाणे खूप सोपे आहे, पण तेथून बाहेर पडणे अवघड आहे. मी भारतात गेल्यावर रेड कार्पेट अंथरले जाईल आणि मला ‘आत ये, तुरुंगात बस’ असे सांगितले जाईल. मी भारताच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी आहे, असे झाकीर नाईकने (Zakir Naik) पाकिस्तानातील एका पॉडकास्टमध्ये म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.