गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील आगीच्या (Zaveri Bazaar Fire) घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमधील झवेरी बाजार या भागात एका इमारतीला भीषण आग लागली आहे.
…आणि अनर्थ टळला
मुंबईतील झवेरी बाजार (Zaveri Bazaar Fire) येथील चायना बाजार इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास लागली आहे. ही बातमी समजताच अग्निशमन दलाच्या 12 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, इमारतीत अडकलेल्या 50 ते 60 लोकांना वेळीच शेजारच्या इमारतीच्या जिन्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.
(हेही वाचा – Love Jihad : जपानमध्ये वाढतेय मुस्लिमांची लोकसंख्या; ‘लव्ह जिहाद’ हे तर कारण नाही ना?)
अग्निशमन दलाचे प्रयत्न…
सुदैवाने या आगीमध्ये (Zaveri Bazaar Fire) कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग लागण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. आग विझवण्यासाठी क्रेनचाही वापर करण्यात आला आहे. इमारतीच्या आणखी एका भागात कूलिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भीषण आगीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग आणि जिन्यांचा काही भाग कोसळला आहे. सर्वजण सुरक्षित आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community