आफ्रिका, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या सात खंडांमध्ये आता आठव्या खंडाचाही शोध लागला आहे. जगामध्ये आठवा खंड आहे, असे निरीक्षण डच व्यापारी आणि खलाशी अबेल तस्मान याने १६४२ साली नोंदवले होते, मात्र हा खंड शोधायला तब्बल ३७५ वर्षे लागली.
‘झिलँडिया’ असे या आठव्या खंडाचे नाव (8th Zeelandia Continent) असून याचा नकाशाही तयार करण्यात आला आहे. या खंडाचे क्षेत्रफळ ४९ लाख चौरस किलोमीटर आहे. हा जगातील सर्वात लहान, निमुळता आणि सर्वात कमी वयोमान असणारा खंड आहे. पॅसिफिक महासागरात हा खंड असून त्याचा ९४ टक्के भूभाग हा समुद्राच्या पाण्याखाली आहे, तर न्यूझीलंडप्रमाणे ६ टक्के भागावर बेटं आहेत. सुमारे ५५ कोटी वर्षांपूर्वी ‘झिलँडिया’ हा प्राचीन महाखंड गोंडावनाचा भाग होता. भूगर्भीय हालचालींमुळे झिलँडियाचा भाग वेगळा झाला आणि सुमद्रात बुडाला.
झीलँड क्राउन रिसर्च इन्स्टिट्यूट जीएनएस सायन्समधील भूवैज्ञानिकांपैकी एक अँडी टुलोच यांच्या मते, झीलँडियाचा शोध असे दर्शवतो की, अत्यंत स्वच्छ असलेली एखादी गोष्टदेखील शोधण्यासाठी वेळ लागू शकतो. गोंडवनपासून झीलँडियाचे वेगळे होणे शास्त्रज्ञांना अजून समजलेले नाही, असेही ते म्हणाले.
(हेही पहा – Asian Games 2023 : जाणून घ्या २९ सप्टेंबरचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक)
असा लागला शोध
डच व्यापारी अबेल तस्मान याने झिलँडिया नावाचा आठवा खंड अतिस्तात असल्याचे ३७५ वर्षांपूर्वी सांगितले होते. १६४२ ला त्याची अधिकृत नोंद करण्यात आली, पण त्यानंतर कित्येक वर्षे शास्त्रज्ञ या खंडाच्या शोधात होते. पृथ्वीवर आठवा खंड आहे, पण तो दिसल्याने शास्त्रज्ञ अस्वस्थ होते. याचे कारण म्हणजे त्याचा बराचसा भाग म्हणजे ९४ टक्के भाग पाण्याखाली होत. डच व्यापारी अबेल तस्मान मोहिमेवर असताना त्याचा न्यूझीलंडमधील साऊथ आयलँडवरील स्थानिक माओरी लोकांशी संपर्क झाला. त्यांनी त्याला याविषयी माहिती दिली. त्यानंतर २०१७ मध्ये भूगर्भशास्त्रज्ञांच्या एका गटाने ‘झिलँडिया’ माओरी भाषेत ‘ते रिउ-अ-माउइ’ या खंडाचा शोध लागल्याचे जाहीर केले, मात्र याचा शोध लागायला २०२३ साल उजाडावे लागले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community