- ऋजुता लुकतुके
मंगळवारी झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स या कंपन्यांमध्ये विलिनीकरणाच्या करारावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याची बातमी पसरली होती. पण, झी कंपनीकडून बुधवारी यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आणि अशी कुठलीही चर्चा सुरू नसल्याचंच कंपनीने म्हटलं आहे. दुसरीकडे, सेबीचंही कंपनीच्या एका व्यवहारावर लक्ष गेलं आहे. आणि झीच्या लेखा अहवालात २००० कोटी रुपयांचा एक व्यवहार सेबीला संशयास्पद वाटतो आहे. त्यामुळे झी कंपनी दुहेरी संकटात सध्या सापडली आहे. (ZEE-Sony Merger)
सेबी आधीपासून झी कंपनीचे प्रमोटर आणि संस्थापक तसंच संचालक मंडळाने केलेल्या विविध व्यवहारांवर लक्ष ठेवून आहे. या चौकशी दरम्यान ही बातमी समोर आली आहे. २४१ दशलक्ष अमेरिकन डॉलरची रक्कम कंपनीतून बाहेर गेल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. (ZEE-Sony Merger)
सध्या सेबीने या व्यवहाराविषयी कंपनीकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. संस्थापक सुभाषचंद्र गोयल, त्यांचा मुलगा पुनित गोयल आणि संचालक मंडळातील काही सदस्य अशा अनेकांना सेबीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यानंतर सेबी या रकमेविषयी आपलं मत बनवेल. झी कंपनीने सेबीच्या सर्व शंकांचं निराकरण करण्यासाठी आम्ही सेबीला सहकार्य करत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. (ZEE-Sony Merger)
Sebi uncovers $241 million accounting issue at Zeehttps://t.co/ouYlyMasKC
Download Economic Times App to stay updated with Business News – https://t.co/9OrG4UGlx3 pic.twitter.com/3aGn9PArso
— SP (@SanjibP51149740) February 21, 2024
(हेही वाचा – Work From Home : वर्क फ्रॉम होम फायदेशीर ? काय म्हणतात टीसीएसचे सीईओ…)
हा ठपका सेबीने झी कंपनीवर ठेवला
झी एंटरटेनमेंट कंपनी पहिल्यांदा सेबीच्या रडारवर आलेली नाही. २०२३ च्या मध्यावर सोनी आणि झी मधील विलिनीकरण करारात अडथळे आले ते सेबीच्या झीचे संस्थापक सुभाषचंद्रा यांच्यावर केलेल्या कारवाईनंतरच. झी कंपनीतून पैसे विविध छोट्या कंपन्यांमध्ये बेकायदेशीररित्या वळवले जात असल्याचा ठपका सेबीने कंपनीवर ठेवला होता. (ZEE-Sony Merger)
आणि सुभाषचंद्र यांना झी तसंच झी ची भागिदारी असलेल्या कुठल्याही कंपनीत संचालक मंडळावर तसंच भागिदार म्हणून राहण्यास सेबीने मनाई केली होती. त्यानंतर सुभाषचंद्र यांनी आपला मुलगा पुनित गोयल याला पुढे केलं. पण, सोनीचा त्यांच्या नेतृत्वालाही विरोध होता. आणि त्यातूनच १० अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याचा हा विलिनीकरण करार फसला होता. (ZEE-Sony Merger)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community