धारावी कोविडमुक्त!

71

मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोविडचा प्रार्दुभाव आता हळूहळू कमी होवू लागला असून ज्या धारावीमध्ये वाढलेल्या कोविडमुळे महापालिकेच्या उरात धडकी भरली होती, ती धारावी मुंबईत लॉकडाऊन केलेल्या दिवशीच कोविडमुक्त झाली आहे. मागील काही दिवसांपासून धारावीमध्ये शुन्य रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही आता शुन्यावर आल्याने खऱ्या अर्थाने धारावी कोविडमुक्त झाल्याचे दिसून आले आहे.

( हेही वाचा : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या हजारांखाली! )

धारावीत एकही सक्रिय रुग्ण नाही

मुंबईतील धारावीत डॉ.बलिगा नगर येथे १ एप्रिल २०२० रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता. त्या रुग्णाचा पुढे मृत्यू झाला. बलिगानगर पासून पसरलेल्या संसर्गाने पुढे मुकुंद नगर, वैभव इमारत अशाप्रकारे हातपाय पसरत संपूर्ण धारावीच्या परिसराला पोखरुन काढले होते. धारावीच्या प्रत्येक रस्त्यांवरील आणि वस्तींमध्ये. अर्थात धारावीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे धारावीतील या वाढत्या रुग्णसंख्येवर अवघ्या जगाचे लक्ष होते. परंतु जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी आपल्या टिमला सोबत घेत येथील कोविडचा आजार नियंत्रणात आणत वाढत्या रुग्णसंख्येला आळा घातला. त्यामुळे आजवर धारावीत रुग्ण संख्या वाढत असेल वाटत असताना त्याठिकाणी एकूण ८६५२ एकूण बाधित रुग्ण आढळून आले. तर त्यातील ८२३३ रुग्ण बरे होवून परतले. उर्वरीत रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी गुरुवारी या धारावीत एकही सक्रिय रुग्ण नसल्याचे आढळून आले.

महापालिका आरोग्य विभाग अलर्ट

जी उत्तर विभागातील धारावीच्या तुलनेत दादर व माहिममध्ये अनुक्रमे एकूण १३,५५० आणि १४,५८४ बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जी उत्तर विभागांमध्ये आजमितीस केवळ १० सक्रिय रुग्ण असून त्यातील दादरमध्ये १ आणि माहिममध्ये ९ रुग्णांचा समावेशा आहे. तर २२ मार्च रोजी माहिममध्ये २ सक्रिय रुग्ण होते, तर २३ मार्च रोजी दोन नवीन रुग्ण आढळून आले होते. परंतु गुरुवारी माहिममध्ये एकाच घरात सात रुग्ण आढळून आले. त्यामुळे माहिमधील सक्रिय रुग्णांची संख्या ९एवढी झाली आहे. विशेष म्हणजे माहिममध्ये एकाच घरात आढळून आलेल्या सातही रुग्ण हे बाहेरुन आले नव्हते किंवा कुठेही गेले नव्हते. घरीच असतानाच त्यांना बाधा झाली असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे. त्यामुळे एकाच घरात सात रुग्ण कसे आढळून आले आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.