राज्यातील ‘हे’ जिल्हे झाले कोरोनामुक्त

70

कोरोनामुळे गेली दोन वर्षे आरोग्य क्षेत्रात रखडत असताना राज्यात वर्षाअखेरिसपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड नियंत्रणात आले. परदेशातून ओमायक्रॉनच्या बीएफ. ७ या विषाणूमुळे परिस्थिती बिघडण्याची शक्यता नसल्यचाा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बरेच जिल्हे आता कोरोनामुक्त होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, नंदुरबार, धुळे, बीड, परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत आता एकही कोरोनाचा रुग्ण नाही.

कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही

२४ डिसेंबरपासून राज्यात मुंबई, पुणे तसेच नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची कोरोना तपासणी सुरु झाली आहे. आतापर्यंत सहा रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासाअंती समजले. त्यापैकी तीन रुग्ण पुणे तर दोन रुग्ण नवी मुंबई आणि एक रुग्ण गोव्यातील आहे. सहाही रुग्ण बीएफ. ७ या विषाणूने बाधित आहेत की नाही याबाबत मात्र आरोग्यविभागाने माहिती दिलेली नाही. १ जानेवारीला राज्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे आरोग्यविभागाकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा #BOYCOTTSonyTV ट्रेंड सुरु; ‘सोनी’च्या ‘क्राईम पेट्रोल’मध्ये आफताब बनला हिंदू, श्रद्धा बनली ख्रिश्चन)

  • राज्यात रविवारी केवळ १६ नव्या कोरोनाच्या रुग्णांचे निदान झाले
  • गेल्या २४ तासांत १९ रुग्ण यशस्वी उपचारानंतर बरे होऊन गेले.
  • राज्यात सध्या केवळ १६१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.