कोविड मृतांचा आकडा तिसऱ्यांदा शून्यावर

169

मुंबईत कोविड रुग्णांच्या मृत्यूचा आकडा शनिवारनंतर पुन्हा एकदा शून्यावर आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आतापर्यंत तिसऱ्यांदा रुग्णांच्या मृत्यूने शून्याची किमया साधली आहे. दोन महिन्यांपूर्वी मृतांच्या आकड्याने शून्याची किमया साध्य केली  होती. त्यानंतर शनिवारी आणि आता बुधवारी पुन्हा शून्य रुग्णाची नोंद झाली आहे.

शून्य मृत्यूची नोंद

बुधवारी दिवसभरात २३८ नवीन रुग्ण आढळून आले आणि २१० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कोविड -१९ सुरू झाल्यापासून तिसऱ्यांदा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. यापूर्वी मार्च-२०२० मध्ये कोविड- १९ सुरू झाल्यानंतर यापूर्वी फक्त १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली होती. त्यानंतर मागील शनिवारी एकाही कोविड रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता.

( हेही वाचा : राज्यात ओमायक्राॅनचा शिरकाव, जनतेची सुरक्षा वाऱ्यावर )

कंटेन्मेंट झोनची संख्या शून्यावर

दिवसभरात ४३ हजार ५५३ चाचण्या करण्यात आल्यानंतर २३८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ही १ हजार ७९७ एवढी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा  २ हजार ५२४ एवढा आहे. मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या शून्य एवढी असून इमारतींची संख्या १५ एवढी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.