BMC : महापालिका रुग्णालयात झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी

मुंबईकरांच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. महानगरपालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (हेल्थ मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम) राबविण्यात येणार आहे. त्यातून रुग्णांची माहिती जतन होऊन रुग्णसेवेत सुसूत्रता येईल. 'झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी' लागू करण्यात येत आहे.

1408
BMC : महापालिका रुग्णालयात झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी
BMC : महापालिका रुग्णालयात झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी

मुंबईकरांच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. महानगरपालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (हेल्थ मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम) राबविण्यात येणार आहे. त्यातून रुग्णांची माहिती जतन होऊन रुग्णसेवेत सुसूत्रता येईल. ‘झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी’ लागू करण्यात येत आहे. यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधे खरेदीची आवश्यकताच उरणार नाही, असे महापालिकेच्या प्रभारी आयुक्त तथा प्रशासक आश्विनी भिडे यांनी स्पष्ट करत विश्वास व्यक्त केला. नागरी सेवा-सुविधांमध्ये आधुनिकीकरण व अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग महानगरपालिकेने स्वीकारला आहे. महानगरपालिकेच्या या प्रयत्नांमध्ये एक नागरिक या नात्याने समस्त मुंबईकरांचा यापुढेही लोकसहभाग मिळावा, सहकार्य मिळावे, जेणेकरुन प्रजासत्ताक संकल्पनेला पूर्ण अर्थ प्राप्त होईल, अशी भावनाही भिडे यांनी व्यक्त केला. (BMC)

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक (प्रभारी) आश्विनी भिडे यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक २६ जानेवारी २०२४) सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळी मुंबईकरांना उद्देशून केलेल्या संबोधनात त्या बोलत होत्या. सोहळ्याच्या प्रारंभी भिडे यांनी सर फिरोजशहा मेहता यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, माजी महापौर श्रद्धा जाधव तसेच सह आयुक्त (विशेष) रमेश पवार, सह आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) विजय बालमवार, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (सुधार) संजोग कबरे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) संजय कौंडण्यपुरे, महानगरपालिका सचिव (प्रभारी) संगीता शर्मा, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते. (BMC)

महानगरपालिकेने काळानुरुप अत्याधुनिक, भव्य प्रकल्प घेतले हाती

ध्वजारोहणानंतर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक (प्रभारी) भिडे यांनी मुंबईकरांना उद्देशून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या कामकाजाचा, प्रकल्पांचा आणि लोकाभिमुख मोहिमांचा आढावा घेणारे संबोधन केले. त्या म्हणाल्या, मुंबईकरांचे जीवनमान सुखकर, सुसह्य करण्यासाठी महानगरपालिकेकडून होत असलेले प्रयत्न कायम राहतील. मुंबई महानगराचे पालकत्व सांभाळताना पायाभूत सुविधा विकासासाठी महानगरपालिकेने काळानुरुप अत्याधुनिक, भव्य प्रकल्प हाती घेतले आहेत. एवढेच नव्हे तर नागरी सेवा-सुविधांमध्ये आधुनिकीकरण व अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग महानगरपालिकेने स्वीकारला असल्याच्या भावना महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक (प्रभारी) आश्विनी भिडे यांनी व्यक्त केल्या. (BMC)

आपला दवाखान्यांमधून घेतला ३० लाख रुग्णांनी लाभ

मुंबईकरांच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. महानगरपालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (हेल्थ मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम -HMIS) राबविण्यात येणार आहे. त्यातून रुग्णांची माहिती जतन होवून रुग्णसेवेत सुसूत्रता येईल. ‘झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी’ लागू करण्यात येत आहे. यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधे खरेदीची आवश्यकताच उरणार नाही. मुंबईकरांना घराजवळ, सोयीच्या वेळेनुसार आणि सर्वसमावेशक व विनामूल्य अशी प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ तसेच पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर सेवेचा आतापर्यंत ३० लाखाहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. (BMC)

वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र क्रांती घडवून आणणारे प्रकल्प

स्थापनेची दीडशे वर्षे अलीकडे पूर्ण करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अग्रगण्य स्थान आहे. वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र क्रांती घडवून आणणारा आणि मुंबईकरांच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम करणारा मुंबई किनारी रस्ता या वर्षात कार्यान्वित होईल. उत्तर मुंबईपर्यंत वाहतूक वेगवान व्हावी म्हणून वर्सोवा ते दहिसर किनारी रस्ता आणि त्यापुढे दहिसर ते मिरा-भाइंदर उन्नत मार्ग, गोरेगाव-मुलूंड हे प्रकल्प देखील महानगरपालिकेकडून नियोजित आहेत. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त असावेत, यासाठी महानगरपालिकेने रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण व्यापक स्तरावर सुरु केले आहे. वेगवेगळ्या पुलांची कामे प्रगतिपथावर असल्याचे आश्वनी भिडे यांनी यांनी सांगितले. (BMC)

भांडुप संकुलात २,००० दक्षलक्ष लीटर क्षमतेचे नवीज जलशुध्दीकरण प्रकल्प

भविष्याचा विचार करता, पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी व पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत. जलबोगद्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. भांडूप संकुल येथे २,००० दशलक्ष लीटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचे नियोजन आहे. (BMC)

सुशोभीकरणा अंतर्गत १२०० कामे पूर्ण

मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली ‘सखोल स्वच्छता मोहीम’ अर्थात डीप क्लीन ड्राइव्ह लोकसहभागातून एक चळवळ बनली आहे. घनकचरा व्यवस्थापनात लोकसहभागाच्या उद्देशाने स्वच्छता दूत नेमण्यात येत आहेत. स्वच्छतेच्या तक्रारींचे जलद, परिणामकारक निवारण करण्यासाठी सुरू केलेल्या ”मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई” या हेल्पलाईनद्वारे आतापर्यंत १० हजारांहून अधिक तक्रारींचा विक्रमी वेळेत निपटारा करण्यात आला असून या कामगिरीसाठी ‘ईटी गव्हर्मेंट डिजीटेक अवॉर्डस’ स्पर्धेमध्ये महानगरपालिकेला सुवर्णपदक प्राप्त झाले, ही महानगरपालिकेसाठी गौरवाची बाब असल्याचेही भिडे यांनी नमूद केले. मुंबई सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत मोकळ्या जागांची निर्मिती, रस्ते, पूल, उड्डाणपूल, वाहतूक बेटं, समुद्रकिनारे, उद्याने, पदपथ, विद्युत स्तंभ, सुशोभीत सार्वजनिक भिंती आदींशी निगडित १,२०० कामे आतापर्यंत पूर्ण केली असल्याचेही त्या म्हणाल्या. (BMC)

(हेही वाचा – BMC : मुंबई महापालिकेत ध्वजारोहण करणाऱ्या आश्विनी भिडे दुसऱ्या महिला अधिकारी)

आयटीतील अद्ययावत व अत्याधुनिक बाबींचा अवलंब

वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने आपली विद्यार्थीभिमुख उपयुक्तता कायम राखली आहे. कामकाजाची प्रक्रिया सुलभ, जलद आणि पारदर्शक होण्याच्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञानातील अद्ययावत व अत्याधुनिक बाबींचा अवलंब केला जात आहे. ऑनलाइन प्रणाली, कॅशलेस आणि पेपरलेस सेवा यावर अधिकाधिक जोर दिला जात आहे. अग्नी सुरक्षेच्या दृष्टिने अग्निशमन व विमोचन कार्यामध्ये अत्याधुनिक संयंत्रांची मदत, नागरिकांकडून सक्त निर्देशांचे पालन, जनजागृती यावर भर देण्यात येत आहे, अशी माहितीही भिडे यांनी संबोधनातून दिली. (BMC)

पदकप्राप्त मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

प्रजासत्ताक दिनी माननीय राष्ट्रपती महोदयांच्या वतीने मुंबई अग्निशमन दलाच्या सहा अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत. याबद्दल त्यांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आश्विनी भिडे यांनी सत्कार केला. यामध्ये उपप्रमुख अग्निशमन अधिकारी हरिश्चंद्र रघू शेट्टी, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल वसंत परब, विभागीय अग्निशमन अधिकारी देवेंद्र शिवाजी पाटील, दुय्यम अधिकारी राजाराम निवृत्ती कुदळे, प्रमुख अग्निशामक किशोर जयराम म्हात्रे, प्रमुख अग्निशामक मुरलीधर अनाजी आंधळे यांचा समावेश आहे. दरम्यान, या सोहळ्यात महानगरपालिका सुरक्षा पथक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत मानवंदना दिली. तर, संगीत कला अकादमीच्या चमूने देशभक्तीपर गीते गायली. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.