Zika Virus: डासांपासून सावध राहा! झिका व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळला

205
Zika Virus: डासांपासून सावध राहा! झिका व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळला
Zika Virus: डासांपासून सावध राहा! झिका व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळला

पुण्यात (Pune News) झिका व्हायरसचा (Zika Virus) तिसरा रुग्ण आढळला आहे. पुण्यातील मुंढवा भागातील एका 47 वर्षीय महिलेचा रक्त चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या आधी पुण्यातील एरंडवणे भागातील एक डॉक्टर आणि त्यांची मुलगी झिका पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यात झीकाचा धोका वाढताना दिसतोय. डासांपासून हा आजार पसरतोय. ऐन वारीच्या तोंडावर झिकाचे तीन रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Zika Virus)

झिकाचा प्रसार हा एडिस एजिप्ती डासापासून

पावसाळा असल्याने अनेक आजार डोकं वर काढत असतानाच पुण्यात याचे दोन रुग्ण आढळले आहेत. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. झिकाचा प्रसार हा एडिस एजिप्ती डासापासून होतो. पुण्यात आतापर्यंत जेव्हा जेव्हा रुग्ण सापडले तेव्हा त्यांनी कुठे ना कुठे प्रवास केला होता किंवा ते कोणाच्या तरी संपर्कात आले होते. मात्र आता सापडलेले रुग्णाच्या संसर्गाची साखळी अद्याप सापडलेली नाही. संसर्गाचे मूळच शोधले नाही तर संसर्गाचा धोका अधिक असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. (Zika Virus)

झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावाने वाढवली चिंता

वारीच्या तोंडावर तीन रुग्ण आढळल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे रविवारी 30 जूनला शहरात दाखल होणार आहेत. 30 जून आणि 1 जुलैला दोन्ही पालख्या मुक्कामी राहणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यात झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंता वाढवली आहे. (Zika Virus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.