राज्यात पुन्हा आढळला झिका व्हायरसचा रुग्ण; वाचा कुठे सापडला?

127

पुण्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्याची माहिती शुक्रवारी दुपारी राज्य विभागाने दिली. पुणे शहरात १८ नोव्हेंबर रोजी झिका व्हायरसचा रुग्ण आढळला. यंदाच्या वर्षांत पालघर जिल्ह्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर चार-पाच महिन्यांनी पुण्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरा झाल्याची माहिती राज्य विभागाने दिली.

पुण्यातील बावधन येथे राहणा-या ६७ वर्षीय इसमाच्या शरीरात झिका व्हायरचा रुग्ण आढळला. १६ नोव्हेंबरला पुण्यातील जहांगीर रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात या वृद्धाने ताप, खोकला व सांधेदुखीची तक्रार केली. रुग्णाला सतत थकवाही जाणवत होता. दोन दिवसानंतर खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात या वृद्धाला झिका व्हायरची लागण झाल्याचे सिद्ध झाले. या घटनेनंतर चार दिवसानंतर पुणे महानगरपालिकेने रोग नियंत्रण कार्ययोजना आखली. रुग्ण राहत असलेल्या परिसरात केलेल्या लोकांच्या तपासणीत एकालाही झिका व्हायरसची संशयित लक्षणे आढळली नाही. खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या अहवालातही रुग्णाला झिका व्हायरची बाधा झाल्याचे उघडकीस आले.

( हेही वाचा: सिद्धिविनायक मंदिरात भ्रष्टाचार; मनसेचा उद्धव गटावर गंभीर आरोप )

रुग्णाबद्दल 

मूळ नाशिक जिल्ह्याचा रहिवासी असलेले ६७ वर्षीय इसम ६ नोव्हेंबरला पुण्यात आले होते. त्यापूर्वी २२ ऑक्टोबरला ते गुजरात राज्यातील सूरतलाही गेले होते. रुग्ण आता झिका व्हायरसच्या उपचारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांच्यात आता कोणतीही झिका व्हायरसची लक्षणे नाहीत.

झिका व्हायरसबद्दल 

  • एडीस या डासाच्या चाव्याने रुग्णाला झिका व्हायरस होतो. या डासामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाही पसरतो.
  • ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोळे येणे, अंगावर पूरळ येणे ही झिका व्हायरसची लक्षणे आहेत.
  • एडीस डासाने चावल्यानंतर आठवड्याभरानंतर रुग्णामध्ये झिका व्हायरसची लक्षणे आढळतात.
  • झिका व्हायरस जीवघेणा नसला तरीही या रुग्णाला अधिक आरामाची आवश्यकता भासते. ताप आणि डोकेदुखीसाठी प्रामुख्याने डॉक्टरांकडून औषधे दिली जातात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.