पुण्यात ‘झिका’ची दहशत! वैद्यकीय विभागाने ‘हे’ दिले निर्देश!  

कोरोना विषाणूमुळे राज्याची स्थिती बिकट झाली असताना, झिका विषाणूने आणखी चिंता वाढवली आहे. बेलसर गावात तर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. झिकाचा राज्यातील पहिलाच रुग्ण बेलसरमध्ये सापडला होता.

पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बेलसर गावात झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रातील पथकाने त्याठिकाणी जाऊन नागरिकांच्या विविध चाचण्या केल्या आहेत. तसेच झिका व्हायरसचा इतरांना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचे  (निरोध) वाटप करण्यात आले आहे. तसेच पुढील किमान चार महिने गावातील महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.

बेलसर गावातील नागरिकांवर आले ‘हे’ निर्बंध!

पुरुषांच्या विर्यात झिका विषाणू आढळत असल्याने पुढील ४ महिने लैंगिक संबंध टाळावेत किंवा सुरक्षित पद्धतीने शरीरसंबंध ठेवावेत, असे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळे राज्याची स्थिती बिकट झाली असताना, झिका विषाणूने आणखी चिंता वाढवली आहे. बेलसर गावात तर सर्वत्र भीतीच वातावरण पसरले आहे. झिकाचा राज्यातील पहिलाच रुग्ण बेलसरमध्ये सापडला होता. यानंतर बेलसर गावाची देशभर चर्चा झाली होती. बेलसरमधील ५५ वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य प्रशासनाकडून बेलसर गावात विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.

(हेही वाचा : बाबासाहेबांना खंत वाटावी असे लंडनमध्ये काय घडले होते? माहित आहे का?)

महिलांच्या गर्भधारणेवर आले बंधन!

त्याचाच भाग म्हणून बेलसर गावात पुढचे तीन महिने कुठलीही महिला गरोदर राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचे वाटप केले आहे. एडिस एजिप्त डासापासून झिका विषाणूची लागण होते. झिका विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना आहे. झिका विषाणूमुळे गरोदर महिलांच्या पोटातील बाळावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. बाळाच्या मेंदूची वाढ खुंटू शकते. तसचे अकाली प्रसूती होण्याचा धोकाही अधिक असतो. झिका विषाणू पुरुषांच्या विर्यात तब्बल चार महिने जिवंत राहू शकतो. त्यामुळे गावातील महिलांनी पुढील किमान तीन महिने गर्भधारणा टाळली पाहिजे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायतीनं गावात विविध ठिकाणी फलक लावून गावात जनजागृती मोहिम हाती घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here