अलिकडे प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार ऑनलाईन पद्धतीने जेवण ऑर्डर करतात. देशभरात ऑनलाईन पद्धतीने जेवण ऑर्डर करण्यासाठी प्रामुख्याने झोमॅटो (Zomato) या अॅपचा वापर केला जातो. झोमॅटोकडून आपल्या वापरकर्त्यांना खूश करण्यासाठी अनेक नवनवीन निर्णय घेतले जातात. आता झोमॅटोने Zomato Instant या उपक्रमाअंतर्गत दहा मिनिटांत फूड डिलिव्हरी करणार अशी घोषणा केली आहे. कंपनीचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी या नव्या उपक्रमाबद्दल ट्वीट करत माहिती दिली आहे.
( हेही वाचा : महागाईने गाठला कळस! आता गॅस सिलिंडरच्या किमतीतही झाली मोठी वाढ )
झोमॅटोचे प्रसिद्धीपत्रक
२१ मार्चला दीपिंदर गोयल यांनी ट्वीटरवर या नव्या योजनेची विस्तृत माहिती दिली. यावेळी झोमॅटोने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. झोमॅटो आता १० मिनिटांमध्ये फूड डिलिव्हरी करणार आहे. दहा मिनिटांत फूड डिलिव्हरी करणे केवळ अशक्य असून यामुळे डिलिव्हरी बॉयची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळेच झोमॅटोने झटपट १० मिनिटांत डिलिव्हरी करताना डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीवर कोणाताही दबाव नसणार आहे त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही आणि हा निर्णय प्रायोगिक तत्वावर फक्त गुरगाव मध्येच सुरू होणार आहे असे झोमॅटोने स्पष्ट केले आहे.
Wohoo! Zomato Instant is here to deliver your food in just 10 minutes – without any risks or penalties for the delivery partners.
Read more about Zomato Instant here: https://t.co/pbr9ySCJ9Z https://t.co/Q82FgOcks4
— zomato (@zomato) March 21, 2022
रोहित पवारांचे ट्वीट
यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे. असे ट्वीट केले आहे. यावर झोमॅटोचा हा निर्णय केवळ गुरगावमध्येच लागू होणार आहे असे रिट्वीट करण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Communityडिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची @zomato ची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉय च्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 22, 2022