Zomato Strike : झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय संपावर, जाणून घ्या काय आहे कारण?

ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्या मुंबईरांचे हाल होण्याची शक्यता

147
Zomato Strike : झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय संपावर, जाणून घ्या काय आहे कारण?
Zomato Strike : झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय संपावर, जाणून घ्या काय आहे कारण?

भूक लागल्या नंतर काही मिनिटातच आपल्याला ऑनलाईन खाद्यपदार्थ घरोघरी पुरवणाऱ्या फुड कंपनी झोमॅटोच्या मुंबईतील सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण आपल्या विविध मागण्यांसाठी झोमॅटॊ डिलिव्हरी बॉय सोमवार (९ ऑक्टोबर) संपावर गेले आहेत.परिणामी ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्या मुंबईरांचे हाल होण्याची शक्यता आहे. (Zomato Strike )

झोमॅटोच्या सेवेमुळे हॉटेल्सच्या मेन्यू कार्ड्सद्वारे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ऑर्डर करू शकता आणि काही मिनिटातच तुमची ऑर्डर थेट तुमच्या पत्त्यावर डिलिव्हर केली जाते. यामुळे तुमचा बराच वेळ वाचतो कारण तुम्हाला स्वतःहून बाहेर पडावे लागत नाही. परंतु आता झोमॅटोच्या एका निर्णयामुळे अनेक नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.शिंदे गट प्रणित राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात सर्व डिलिव्हरी बॉय हा लढा लढणार आहेत. दरम्यान, मुंबईतील झोमॅटो डिलिव्हरी बॉईजनी पुकारलेल्या संपामुळे ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्या मुंबईरांचे हाल होण्याची शक्यता आहे. (Zomato Strike )

(हेही वाचा : Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू, महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या झळा)

झोमॅटो डिलिव्हरी बॉईजच्या मागण्या काय?.

  • सर्व डिलिव्हरी बॉईजला समान ऑर्डर मिळाव्यात आणि पैसे वाढवून मिळावेत
  • पीक अप ३ किमी आणि ड्रॉप ७ किमी असावा
  • जुन्या मात्र कमी केलेल्या मुलांना पुन्हा कामावर घ्यावं
  • रायडरसोबत त्यांच्या कुटुंबियांनाही इन्शुरन्स मिळावा
  • इंसेंटिव्ह सर्वांना समान मिळावा आणि इतर मागण्या

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.