ग्राहकांसाठी झोमॅटोने पुन्हा सुरु केली ‘ही’ जुनी ऑफर

झोमॅटोने ग्राहकांसाठी (Zomato) पुन्हा एकदा जुनी ऑफर नव्याने लाॅंच केली आहे. झोमॅटोने Zomato Gold ही ऑफर लाॅंच केली आहे. त्यानुसार, युजर्सना डायनिंग आणि फूड डिलिव्हरीवर सवलत दिली जाणार आहे. या ऑफरसाठी ग्राहकांना तीन महिन्यांसाठी 149 रुपये मोजावे लागणार आहेत. Zomato Gold ऑफर घेणा-यांना 10 किमी अंतरात अनलिमिटेड फूड डिलीव्हरीचा लाभ मिळणार आहे. झोमॅटो गोल्ड हे जुने नाव असले तरी ब्रांड न्यू मेंबरशिप आहे.

यामध्ये ग्राहकांना फ्री डिलिव्हरीचा (free delivery) लाभ मिळणार आहे. त्याशिवाय,पिक टाइममध्ये व्हीआयपी अॅक्सेससह (VIP Access) इतरही फायदे मइळणार आहेत.

( हेही वाचा :माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर )

Zomato Instant ही सुविधा पुन्हा एकदा करणार लाॅंच

ज्या ग्राहकांकडे प्रो अथवा प्रो प्लस मेंबरशिप एडिशन कार्डसह मिळाली आहे. त्यांची मेंबरशिप 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत अॅक्टिव्ह राहिल. त्यानंतर त्यांना झोमॅटो गोल्डची तीन महिन्यांची मेंबरशिप दिली जाईल. झोमॅटोने आपली 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी करणारी Zomato Instant स्किम सध्या गुंडाळली आहे. दिल्ली एनसीआर आणि बंगळुरुमध्ये Zomato Instant ही सुविधा सुरु केली होती. मात्र, Zomato Instant ला ग्राहकांकडून फारसा  प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे किमान खर्च ही वसूल होत नव्हता. कंपनी Zomato Instant ही खास सुविधा कालांतराने पुन्हा एकदा रिलाॅंच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here