- ऋजुता लुकतुके
कोलकात्याच्या एका माणसाने ३१ डिसेंबरच्या रात्री चक्क एकाच वेळी १२५ रुमाली रोटींची ऑर्डर दिली. झोमॅटोच्या मालकांनी यावर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होतेय.
३१ डिसेंबरला सगळे वर्षअखेरीच्या पार्टीमध्ये गुंग होते आणि पार्टीसाठीच्या मोठ्या मोठ्या खाद्य पदार्थांच्या ऑर्डर ऑनलाईन फू़ड डिलिव्हरी ॲपवरही बुक होत होत्या. झोमॅटो या देशातील आघाडीच्या ॲपवर एका माणसाने चक्क १२५ रुमाली रोटींची ऑर्डर दिली.
झोमॅटोचे संस्थापक आणि अध्यक्ष दिपिंदर गोयल यांनी ट्विटरवर ही ऑर्डर शेअर केली आणि त्याबरोबर एक मजेशीर संदेशही लिहिला. ‘कोलकात्यातील या पार्टीला जायला मला नक्की आवडेल. तिथे एकाच वेळी एक पदार्थाच्या १२५ ऑर्डर आहेत,’ असं त्यांनी लिहिलं. आणि लोकांनी उत्सुकतेनं असा कुठला पदार्थ आहे, असा प्रश्न विचारल्यावर दिपिंदर यांनी काही वेळाने माहिती करून घेऊन हा पदार्थ म्हणजे रुमाली रोटी असल्याचंही स्पष्ट केलं.
(हेही वाचा – Chandrapur: विजासन लेणीवरील ऐतिहासिक बुद्ध लेणीची विटंबना, चंद्रपुरात विविध ठिकाणी आंदोलन)
Really want to attend the party in Kolkata – where someone just ordered 125 items in a single order 🤯
— Deepinder Goyal (@deepigoyal) December 31, 2023
1 delivery partner
(just checked – all 125 are rumali rotis 😂)— Deepinder Goyal (@deepigoyal) December 31, 2023
दिपिंदर यांच्या या पोस्टनंतर ती काही तासांतच व्हायरल झाली. ३ लाखांच्या वर लोकांनी २४ तासांच्या आत ती पाहिली होती. आणि त्यावर हजारो प्रतिक्रिया होत्या. एकाने म्हटलं होतं, ‘पॉटलक पार्टी दिसतेय. बाकीचे पदार्थ काय आहेत? तुम्ही काय नेणार?’
एकाने विचारलंय की, ‘हीच सगळ्यात मोठी ऑर्डर होती का?’
यावर गोयल यांनी उत्तरही दिलं. ‘८ वाजून ६ मिनिटांनी सगळ्यात जास्त म्हणजे ८,४४२ ऑर्डर झोमॅटोवर आल्या, असं त्यांनी म्हटलंय.
8422 orders were placed at 8:06 pm – that’s 140 orders every second 😯
— Deepinder Goyal (@deepigoyal) December 31, 2023
झोमॅटोवर आलेल्या ऑर्डरचे इतरही काही तपशील दिपिंदर गोयल यांनी दिले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, झोमॅटोवर वर्षअखेर पार्टी करणारे बहुसंख्य लोक बंगळुरूचे होते. या शहरातून काही इव्हेंट्सच्या एकत्र ऑर्डर आल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय वर्षअखेरच्या ऑर्डर मागवण्यासाठी झोमॅटोला पसंती देणाऱ्या लोकांचे त्यांनी आभारही मानले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community