Zomato Share Price : झोमॅटोवर आता चित्रपटाची तिकिटंही मिळणार? पेटीएमबरोबर बोलणी सुरू

zomato share price : जर हा करार झाला तर तो १,५०० कोटी रुपये मूल्याचा असेल

293
Zomato Share Price : झोमॅटोवर आता चित्रपटाची तिकिटंही मिळणार? पेटीएमबरोबर बोलणी सुरू
Zomato Share Price : झोमॅटोवर आता चित्रपटाची तिकिटंही मिळणार? पेटीएमबरोबर बोलणी सुरू
  • ऋजुता लुकतुके

अन्नपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या झोमॅटो कंपनीने आता चित्रपटाची तिकिटं आणि इव्हेंट्सची तिकिटं ऑनलाईन देता यावीत यासाठी पेटीएमशी बोलणी सुरू केली आहेत. काही दिवसांपूर्वी १,५०० कोटी रुपयांचा हा व्यवहार असल्याची बातमी काही ठिकाणी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर झोमॅटोनं सोमवारीच शेअर बाजाराला या संभाव्य व्यवहाराची लेखी माहिती दिली आहे. झोमॅटो ही पब्लिक लिमिटेड कंपनी असल्यामुळे अशा व्यवहारांची माहिती शेअर बाजाराला आणि पर्यायाने गुंतवणूकदारांना देणं त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. (Zomato Share Price)

(हेही वाचा- Kanchanjunga Express Train Accident १५ जणांचा मृत्यू, ६० जखमी; पंतप्रधान मोदींकडून आर्थिक मदत जाहीर)

‘आम्ही पेटीएमबरोबर बोलणी करत आहोत, हे खरं आहे. पण, अजून कुठल्याही ठोस करारापर्यंत आम्ही पोहोचलेलो नाही,’ असं लेखी उत्तरात झोमॅटोनं म्हटलं आहे. पण, याचा एक अर्थ स्पष्ट आहे की, अन्नपदार्थ पोहोचवण्याबरोबरच सेवेचा विस्तारही त्यांना करायचाय हे स्पष्ट आहे. (Zomato Share Price)

Untitled design 40

शेअर बाजारातही या बातमीने चैतन्य पसरलं आहे. आणि झोमॅटो कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारपासून सकारात्मक वातावरण आहे. शुक्रवारी राष्ट्रीय शेअर बाजार बंद होताना झोमॅटोचा शेअर ०.६८ टक्क्यांनी वाढून १८६.१९ वर बंद झाला. आणि सध्या शेअर ५२ आठवड्यातील उच्चांक २०७ च्या जवळ जाण्याच्या प्रयत्नांत दिसतो आहे. (Zomato Share Price)

(हेही वाचा- Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha: शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख ठरली; ‘इथे’ मिळणार वाघनखांचं दर्शन)

झोमॅटोचा पेटीएमबरोबरचा करार त्यांना सेवा विस्तारात लवचिकता देऊ शकतो. ते सिनेमा आणि मनोरंजनाच्या तिकिटांबरोबरच छोटेखानी प्रवासाची तिकिटं उपलब्ध करून देऊ शकतात. आणि त्या व्यवसायातील सवलती, कॅशबॅक यांचं नियोजनही नीट करू शकतात. (Zomato Share Price)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.