सध्या ऑनलाईन फूड डिलिव्हरीला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीमध्ये झोमॅटो ही एक अग्रेसर कंपनी मानली जाते. पण आता लवकरच Zomato आपल्या स्ट्रक्चरसह अनेक गोष्टींमध्ये बदल करणार असल्याचे समजत आहे. यामध्ये झोमॅटोचे नाव बदलण्याचा देखील विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
झोमॅटोचे होणार रिब्रँडिंग
झोमॅटो व्यवस्थापन लवकरच एक पॅरेंट कंपनी स्थापणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या झोमॅटोमध्ये झोमॅटो, ब्लिंकिट,हायप्योअर, फिडिंग इंडिया अशा चार ब्रँडचा समावेश आहे. या चारही कंपन्या एका पॅरेंट कंपनीखाली आणून ऑपरेट करण्याचा विचार झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल करत आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी व्यवसाय चालवण्यासाठी कंपनीचे निरनिराळे सीईओ असतील. त्याचप्रमाणे झोमॅटोचे रिब्रँडिंग होणार असून इटर्नल असे नाव देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत कंपनीकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
(हेही वाचाः संपूर्ण देशात एकाच दरात मिळणार सोने-चांदी! काय आहे One Nation One Gold rate योजना?)
झोमॅटोचे सध्यातरी नाव बदलणार नसून, इटर्नल हे फक्त इंटरनल नाव राहील, असं स्टार्ट अपच्या सीईओंनी सांगितलं आहे. एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत झोमॅटोचा कन्सोलिटेड तोटा वाढून तो 185.7 कोटी रुपये इतका झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community