दक्षिण आफ्रिकेतील सिएरा लिओन (Sierra Leone) या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. ‘झॉम्बी ड्रग’ (Zombie Drug) बनवण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात मृतदेहांची चोरी केली जात आहे. यासाठी कित्येक ठिकाणी थडग्यांना उकरलं जात असल्याचंही समोर आलं आहे. सिएरा लिओनचे राष्ट्रपती ज्युलियस माडा बियो (Julius Mada Bio) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रगचं नाव कुश (Kush) असं आहे. देशातील कित्येक नागरिकांना या ड्रगचं (Zombie Drug) व्यसन लागलं आहे. विशेष म्हणजे देशातील रुग्णालयांमध्ये असणारे 63 टक्के रुग्ण हे याच ड्रगचे (Zombie Drug) व्यसनी आहेत, असंही बियो यांनी सांगितलं. यामुळे देशातील मृत्युदर ही वाढतच आहे. (Zombie Drug)
(हेही वाचा –CM Eknath Shinde: राज्यात विकासाची गंगा वाहतेय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
‘कुश’ ड्रग्स (Kush Drugs) बनवण्यासाठी विविध पदार्थांचा वापर होतो. मात्र यातील मुख्य घटक हा चक्क मानवी हाडं आहेत. यामुळे हे ड्रग्ज (Zombie Drug) बनवणारे लोक थडग्यांना उकरुन मृतदेहांची चोरी करत आहेत. यामुळे देशातील कित्येक दफनभूमींबाहेर पोलिसांचा पहारा ठेवावा लागत आहे. हा अमली पदार्थ सुमारे सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा समोर आला होता. याचं सेवन करणारी व्यक्ती कित्येक तास नशेत राहते. मात्र यामुळे शरीराला सूज येण्यासह कित्येक दुष्परिणाम दिसून येतात. हे ड्रग (Zombie Drug) आता सिएरा लिओनसाठी मोठी समस्या ठरत आहे. ड्रग (Zombie Drug) बनवणाऱ्या कित्येक टोळ्यांनी आतापर्यंत हजारो थडग्यांमधून मृतदेह आणि सापळ्यांची चोरी केली आहे. (Zombie Drug)
(हेही वाचा –Bengaluru Blast: बेंगळुरू बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएची कारवाई, पश्चिम बंगालमधून आरोपी आणि सूत्रधाराला अटक)
सिएरा लिओन सायकॅट्रिक रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अब्दुल जल्लोह यांनी आणीबाणीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या ड्रगला (Zombie Drug) लढा देण्यासाठी हे गरजेचं असल्याचं ते म्हणाले. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यांमध्ये या ड्रगचं सेवन करणाऱ्या कित्येक तरुणांचं ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झालं आहे. 2020 ते 2023 या काळात कुश संदर्भातील आजारांची लागण झालेल्या रुग्णांचं प्रमाण 4,000 टक्क्यांनी वाढलं आहे. (Zombie Drug)
हे पहा –
Join Our WhatsApp Community