सध्या देशभरात मृत्यूचे तांडव करणाऱ्या कोरोनाला थोपवण्यासाठी एकही औषध उपलब्ध नाही म्हणून जगभरातील देश हताश झाले आहेत, अशा निराशावादी वातावरणात भारतात मात्र आशेचा किरण निर्माण झाला आहे. भारतीय औषधी नियामक संस्थेने (डीजीसीआय) झायडस कॅडिलाच्या कावीळवरील औषधाला कोरोनावरील उपचारासाठी मान्यता दिली आहे. झायडस कॅडिलाचे पेगीहेप (पेगिएफएन) हे विषाणुजन्य संसर्गावर प्रभावी ठरल्याचे कॅडिला हेल्थ कंपनीने म्हटले आहे.
९१.१५ टक्के कोरोनाबाधित रुग्ण बरे होतात!
कॅडिला हेल्थ कंपनीच्या माहितीनुसार रुग्णांवर उपचार केल्यानंतर 91.15 टक्के रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी ही 7 दिवसात निगेटिव्ह आली आहे. कॅडिला हेल्थकेअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल म्हणाले की, सुरुवातीच्या काळात विषाणुचा संसर्ग कमी होण्याकरता पेगीहेपचे उपचार लक्षणीय उपयोगी ठरले आहेत. कोरोनाच्या लढ्यात अत्यंत गरज असताना आम्ही आणखी चांगल्या थेरपी देणे सुरुच ठेवणार आहोत. पेगएफएन औषधांमुळे कोरोनाबाधित रुग्णाला लागणाऱ्या ऑक्सिजनची आवश्यकता कमी होत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. औषधामुळे रुग्णाला लागणारा ऑक्सिजन 84 तासांवरून 56 तास होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रुग्णाला सुरुवातीच्या काळात दिलेला एक डोसही खूप सुधारणा करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पेगएफएन हे यापूर्वी कावीळ बी आणि कावीळ सी प्रकारच्या गंभीर रुग्णांना दिले जात होते.
Join Our WhatsApp Community