कोरोनावर भारी पडणार ‘ही’ निडल फ्री लस!

113

कोरोनाच्या प्रत्येक व्हेरियंटवर प्रभावी लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सादर केली जाणार असून येत्या काही आठवड्यात या लसीला मर्यादित स्वरूपात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.  झायडस कॅडिला (ZyCoV-D) ही जगातील पहिली डिएनए आधारित आणि निडल फ्री कोविड-19 लस आहे. देशात सुरूवातीच्या टप्प्यात केवळ 7 राज्यांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. सात राज्यांमध्ये बिहार, झारखंड, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

 निडल फ्री लस

बारा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी आपत्कालीन वापरासाठी या लसीला मंजूरी देण्यात आली आहे. तथापि, बालकांच्या लसीकरणाबाबत कोणतेही धोरण नसताना, केंद्र सरकारने प्रथम प्रौढांमध्ये लस वापरण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने प्रति डोस 265 रुपये या दराने 10 दशलक्ष लसीच्या डोसची ऑर्डर दिली आहे. याव्यतिरिक्त, निडल फ्री इंट्राडर्मल ऍप्लिकेटरची किंमत म्हणून अतिरिक्त 93 रुपये कंपनीकडून आकारण्यात आले आहेत.  फार्माजेट (Pharmajet) हे नीडल फ्री अ‍ॅप्लिकेटर आहे. यामध्ये painless intradermal vaccine देता येऊ शकतं. याचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

( हेही वाचा : ‘दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक वाहनं पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीत’ )

झायडस ही तिसरी लस

20 ऑगस्ट रोजी, भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने झायडसला आपत्कालीन वापरासाठी अधिकृतता दिली परंतु लसीकरण मोहिमेत त्याचा समावेश करणे बाकी आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन सोबत वापरली जाणारी झायडस ही तिसरी लस असणार आहे. हिमाचल प्रदेशातील कसौली येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेने दर्जेदार गुणवत्तेच्या चाचण्यांद्वारे झायडस लसीचे जवळपास २ लाख ५० हजार डोस बाजारात दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.