तरसाला दुचाकीची धडक, शरीराची हालचाल मंदावली

340

पुण्यातील जुन्नर तालुक्यात तरसाला दुचाकीने धडक दिली. या धडकेल तरसाला जबर जखमा झाल्या. हा तरस रस्त्यावरच निपचित पडून राहिल्याचे स्थानिकाने पाहिल्यानंतर वनविभागाला याबाबतची माहिती दिली.

दीड वर्षांच्या तरसाला आता स्वतःला सावरता येतेय. त्याची तब्येत पूर्ण सुधारल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.
– डॉ. निखिल बाणकर, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव एसओएस बिबट्या पुनर्वसन केंद्र, जुन्नर, पुणे

प्राण्यांच्या अतिदक्षता विभागात दाखल

ही घटना जुन्नरमधील ओतूर येथे घडली. वनविभागाने रस्त्यावर पडलेल्या तरसाला उचलून जुन्नर येथील वन्यजीव एसओएस बिबट्या पुनर्वसन केंद्रांत दाखल केले. डॉक्टरांनी तपासताना तरसाला शरीराची हालचालही करता येत नसल्याचे दिसून आले. शरीरावरील जखमांची तपासणी पाहता तरसाला दुचाकीची धडक लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या तरसाला स्वतःचे वजनही पेलवता येत नसल्याने तातडीने त्याला प्राण्यांच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

(हेही वाचा : आता एसटी कामगार कुटुंबकबिल्यासह उतरणार रस्त्यावर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.