पुणे – सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे दुचाकीस्वाराला वाचवण्याचा नादात खाजगी बस उलटून १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे काही वेळ वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे पहायला मिळाले.
( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासह ‘या’ तीन ठिकाणी ‘मोडी लिपी स्पर्धा २०२३’ चे आयोजन )
खासगी बस उलटल्याने अपघात
राहुल गंगाधर तरटे (नांदेड), नेहारीका नागनाथ हांडे, शंकुतला दिंगबर वाळके, साक्षी नागनाथ हांडे (देहु आळंदी पुणे), विग्नेश रमेश गकुला धाराशीव, पुष्पराज हनुमंतराव पाटील, ऐरना जठार गुमेरला, माणिकेम मुतीराज जकाला, मुनीराज मुताबा जकाला, सुलोचना कृष्णा रेड्डी अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अजित प्रल्हाद इंगवले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
स्थानिक पोलिसांनी दिली माहिती
खाजगी ऑरेंज कंपनीची प्रवासी बस मुंबई ते निजामाबाद असा प्रवास करत होती. ही बस दौंड तालुक्यात पुणे – सोलापूर महामार्गावर भांडगाव गावच्या हद्दीत आल्यावर अचानक दुचाकीस्वार समोर आल्याने बस त्याला वाचविण्याच्या नादात महामार्गावर उलटली. यामध्ये १० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला, पुरुष व लहान मुलांचा समावेश आहे. अपघातादरम्यान बसमधून एकूण ३८ प्रवासी प्रवास करीत होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
( हेही वाचा : Beach Shacks: कोकणाच्या चार जिल्ह्यांतील ८ समुद्रकिनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यास मान्यता)
याबाबत माहिती मिळताच तातडीने यवत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी तातडीने जखमींना उपचारासाठी चौफुला व यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यवत ग्रामीण रुग्णालयातील चार गंभीर जखमी रुग्णांना ससून येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
हेही पहा :
निवडणूक आयोगापेक्षा उद्धव ठाकरेंचा पाकिस्तानवर विश्वास
Join Our WhatsApp Community