होलिकोत्सव हा आनंदाचा सण आहे. होलिका दहनाच्या माध्यमातून आपल्यातून वाईट प्रवृत्ती, राग, मतभेद जाळून एकमेकांप्रती प्रेमभाव निर्माण करण्यासाठी संधी देणारा हा सण होता. त्यानुसार मित्र आणि कुटुंबियांना कशा शुभेच्छा द्याल? (Holika Dahan Wishes in Hindi)
1. होळीच्या मराठीमध्ये सदिच्छा
होळी सणाच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस, असमाधान यांचे दहन होवो,
आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, समाधान, आरोग्य आणि शांती नांदो
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
2. सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, होळीच्या ज्वालेत वाईटाचा समूळ नाश होवो! तुमचं आयुष्य रंगबेरंगी होवो याच होळीच्या हार्दिक शुभेच्छा
3. रंगांचा या सणाला आता तुमचा आनंद तुमच्यासोबत आणा… आमच्याकडील रंग तुम्हाला घ्या… तुमच्याकडील रंग आम्हाला द्या… रंगांची ही देवाणघेवाण अशीच राहो… सगळ्यांचंच आयुष्य रंगबेरंगी होवो…
4. आजच्या होळीत तुमचे सर्व दु:ख आणि वेदना जाळून टाका…आणि उद्याच्या रंगांमध्ये आनंदाची उधळण करा… आपलं आयुष्य अधिकाधिक सुखाने भरो… याच होळीच्या सदिच्छा…
5. आपलं जीवन रंगांपेक्षा अधिक रंगीत होवो… त्यात नकारात्मक भावनांना कोणतेही स्थान नको… याच होळीच्या मनापासून सदिच्छा…
6. खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या रंगामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, तुम्हाला माझ्या परिवारातर्फे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
(हेही वाचा Vasant More : अखेर राज ठाकरेंचा ‘वसंता’ गेला सोडून)
7. मत्सर, द्वेष, मतभेद सारे विसरू रे
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरूया रे
होळीच्या आगीत मनातली नकारात्मकता जाळू रे
चला रे चला रंगांची उधळण करु रे
होळीच्या खूप सदिच्छा
8. पुरणपोळीचा गोडवा आपल्या नात्यात येवो,
रंगाची उधळण मनात होवो
मिटून जाऊदेत मतभेद सारे
सुख-समाधान-शांतीचा उत्सव होवो
होळीच्या हार्दिक सदिच्छा
9. नैराश्याची बांधा मोळी
पेटवूया तिला होळीच्या जाळी
आनंदाचे भरते येवो
सुख-समाधानाच्या रंगांची उधळण होवो
होळीच्या हार्दिक सदिच्छा
10. वाईटाचा होवो नाश, आयुष्यात येवो सुखाची लाट, होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
11. होळीच्या दिवशी करुन होलिका दहन, संपवूया वाईट प्रवृत्ती आणि आणूया आनंद, होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा !
12. तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,
प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला जावो
रंग इतके उधळूया की नकारात्मकता दूर जावो
13. मी तुम्हाला होळीच्या आगाऊ शुभेच्छा देतो आहे! या रंगांच्या सणात तुम्हाला आनंद, सुख, समाधान आणि समृद्धी लाभो
14. मला अशी आशा आहे की तुमची ही होळी आनंद, प्रेम आणि अंतहीन आनंदाने भरलेली असेल. होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा
15. राधाचा रंग आणि कान्हाची पिचकारी… दोघांमधील प्रेम असंच बहरत राहो… तुमच्या नात्यातही असाच आनंद रंगांप्रमाणे उधळत राहो…
Join Our WhatsApp Community