Budget 2023: अर्थसंकल्पाच्या सुरुवातीचे १० महत्त्वाचे मुद्दे आणि घोषणा

164

अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) लोकसभेत अर्थसंकल्प २०२३-२४ (Budget 2023) सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य जनतेला खूप आपेक्षा आहेत. सरकारकडून काय घोषणा होतात आणि दैनंदिन आर्थिक गणितावर काय परिणाम होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत निर्मला सीतारामण यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान अर्थसंकल्पातील सुरुवातीचे सुरुवातीचे १० महत्त्वाचे मुद्दे आणि घोषणा जाणून घ्या.

  1. अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामण सुरुवातीला म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्था ही एक चमकता तारा असल्याचे जगाने मान्य केले आहे. तसेच अर्थव्यवस्था ७ टक्के दराने विकास करेल, जी जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वाधिक असेल.
  2. कृषी क्षेत्रासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी निधी निर्माण केला जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे सीतारामण यांनी स्पष्ट केले आहे.
  3. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत एक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. आता या योजनेंतर्गत गरिबांना एक वर्षासाठी मोफत धान्य मिळणार आहे.
  4. अर्थमंत्री म्हणाल्या की, गेल्या काही वर्षात भारतीय लोकांचे दरडोई उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे वार्षिक दरडोई उत्पन्न १.९७ लाख रुपये झाले आहे. तसेच आता भारतीय अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक संघटित झाली आहे.
  5. सरकारने रोजगार वाढवण्यावर अधिक भर दिला आहे. अर्थमंत्र्यांनी चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर सुमारे ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
  6. सरकारने २२० कोटी कोविडच्या लसीचे डोस दिले आहेत. ४४.६ कोटी लोकांना ते पीएम सुरक्षा आणि पीएम जीवन ज्योती योजनेतून मिळाले आहेत.
  7. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ७ प्राधान्यक्रम असतील. अॅग्रीकल्चर एक्सीलेटर फंडातून अॅग्री स्टार्टअप्स वाढतील.
  8. सबका साथ, सबका विकास या माध्यमातून सरकार पुढे जात आहे. २८ महिन्यांमध्ये ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
  9. यंदाचा अर्थसंकल्प विशेषतः तरुणांना आणि सर्व वर्गातील लोकांना आर्थिक बळ देणारा असल्याचे सीतारामण म्हणाल्या.
  10. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्सची स्थापना केला जाईल. जगभरात देश मजबूत करण्यावर भर दिला जाईल. ग्रामीण महिलांसाठी ८१ लाख बचत गटांना मदत करण्यात आली आहे आणि ती आणखी वाढवली जाईल.

(हेही वाचा – Budget 2023: ‘या’ शब्दांचा अर्थ जाणून घ्या, तुम्हाला अर्थसंकल्प समजण्यास होईल सोपे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.