मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, १० नागरिकांचा मृत्यू

सेंट्रल मेक्सिकोमधील बारमध्ये अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात येथील १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने अचानक बारमध्ये प्रवेश करत गोळीबारास सुरूवात केली. गोळीबारानंतर बारमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तेथील उपस्थित नागरिकांची धावपळ सुरू झाली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला.

(हेही वाचा – #PIBFactCheck : मोदी सरकारकडून विद्यार्थ्यांना FREE लॅपटॉप? वाचा काय आहे सत्य…)

दरम्यान मे महिन्यातही अशाचप्रकारे झालेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच मार्च महिन्यात सेंट्रल मेक्सिकोमध्ये १९ लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

स्टेट अॅटर्नी जनरल ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे चार महिन्यातील ही पाचवी घटना होती. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण मेक्सिकोमध्ये पसरले आहे. डिसेंबर २००६ मध्ये सरकारने वादग्रस्त लष्करी अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन सुरू केल्यापासून मेक्सिकोमध्ये तीन लाखांहून अधिक हत्या झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here