Chhattisgarh Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुरूंग स्फोटात ११ जवान हुतात्मा

नक्षलवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. (Chhattisgarh Naxal Attack)

188
Chhattisgarh Naxal Attack 10 security personnel, driver killed in Naxal attack in Dantewada
Chhattisgarh Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुरूंग स्फोटात ११ जवान हुतात्मा

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात १० डीआरजी जवान आणि एक चालक हुतात्मा झाले आहेत. बस्तरचे आयजी सुंदर राज पी यांनी नक्षलवादी हल्ला आणि जवान हुतात्मा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Chhattisgarh Naxal Attack)

२०१८ नंतर झालेला हा मोठा नक्षलवादी हल्ला (Chhattisgarh Naxal Attack)

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर दंतेवाडा येथून नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेसाठी डीआरजी फोर्स पाठवण्यात आले होते. मोहिमेनंतर परतत असताना, नक्षलवाद्यांनी अरणपूर रस्त्यावर आयईडीचा (भूसुरूंग) स्फोट केला. यामध्ये मोहिमेत सहभागी असलेले १० डीआरजी जवान आणि एक वाहन चालक असे ११ जण हुतात्मा झाले आहेत. अचानक झालेल्या या भीषण स्फोटासाठी जवान अजिबात तयार नव्हते. राज्यात २०१८ नंतर झालेला हा मोठा नक्षलवादी हल्ला आहे. या घटनेनंतर तात्काळ अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी रवाना करण्यात आले. (Chhattisgarh Naxal Attack)

Chhattisgarh Naxal Attack 10 security personnel, driver killed in Naxal attack in Dantewada
Chhattisgarh Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुरूंग स्फोटात ११ जवान हुतात्मा

(हेही वाचा- सोन्याच्या तस्करीसाठी परदेशी महिलांचा वापर; मुंबई विमानतळावर १८ सुदानी महिलांना १६ किलो सोन्यासह अटक)

नक्षलवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. राज्याचे आयजी सुंदर राज पी यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या हल्ल्याची गंभीर दखल घेत तात्काळ मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नक्षलवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही शाह यांनी दिली आहे. (Chhattisgarh Naxal Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.