कृषी उत्पादित मालाच्या आयात- निर्यातीसाठी बॅंकांकडून कर्ज घेतल्यानंतर, कर्जाची परतफेड न करता त्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरात 12 कृषी उत्पादक कंपन्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) रडारवर आल्या आहेत. या कंपन्यांनी बॅंकांना सुमारे 1 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समजते. गेल्या पाच वर्षांत सुमारे 100 कृषी उत्पादक कंपन्यांनी बॅंकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तांदूळ, डाळी, मसाले, काॅफी अशा विविध कृषी उत्पादित मालांची आयात व निर्यात करणा-या कंपन्यांकडून बॅंकांचे कर्ज बुडवण्याचे प्रकार गेल्या पाच वर्षांपासून होताना दिसत आहेत. यातील पहिले प्रकरण सप्टेंबर 2017 मध्ये उजेडात आले होते. मसाले आणि काॅफीच्या आयात-निर्यातीमध्ये कार्यरत असलेल्या मे. रावतेर स्पाईस कंपनीने जम्मू- काश्मिर बॅंकेकडून कर्ज घेतले होते. कंपनीने बॅंकेची 352 कोटी 72 लाख रुपयांची फसवणूक केली. याखेरीज सीबीआयने कारवाई केलेल्या कंपन्यांमध्ये देशातील अनेक मोठ्या कृषी उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.
( हेही वाचा: औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे प्रकरण? )
या कंपन्यांनी घातला गंडा
श्री वसंत ऑईल कंपनीने कर्ज देणा-या बॅंकेला 124 कोटी रुपयांचा गंडा घातला. सौरव प्रा.लि. या कंपनीनेही बॅंकांचे 126 कोटी रुपये थकवले आहेत. याचसोबत गेल्या वर्षी बॅंकेला 114 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सीबीआयने श्री जलाराम राईस कंपनीवरही कारवाई केली होती. सर्वात गाजलेली कारवाई होती शक्ती भोग आटा या कंपनीवरील. याप्रकणी 31 डिसेंबर 2021 रोजी सीबीआयने कारवाई केल्यानंतर, कंपनीने 10 बॅंकांना 3 हजार 269 कोटी 42 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले.
Join Our WhatsApp Community