मुंबईत १०० किलो गोल्ड पोटॅशियम डायसायनाईड जप्त

महसूल संचालनालय विभागाने (डीआयआर) मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्स येथून १०० किलो गोल्ड पोटॅशियम डायसायनाईड जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या ‘गोल्ड पोटॅशियम डायसायनाईड’ची किंमत ३२ कोटी रुपये असल्याची माहिती डीआयआरने दिली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

दुबईत होणार होते निर्यात

जप्त करण्यात आलेले गोल्ड पोटॅशियम डायसायनाईड हे मुंबईतून दुबईत निर्यात होणार होते, अशी माहिती डीआयआरच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. मुंबईतून दुबईत मोठ्या प्रमाणात ‘गोल्ड पोटॅशियम डायसायनाईड’ बेकायदेशीररित्या निर्यात करण्यात येणार असून, मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्स याठिकाणी याचा साठा असल्याची माहिती डीआयआरला मिळाली होती.

(हेही वाचाः मांजरीला ठार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! ‘त्या’ ग्राहकाचा पोलिसांकडून शोध सुरु!)

तब्बल ३२ कोटी रुपये किंमत

डीआयआरने शनिवारी मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्समधून १०० किलो गोल्ड पोटॅशियम डायसायनाईडचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गोल्ड पोटॅशियम डायसायनाईडची बाजारभाव किंमत ३२ कोटी रुपये असल्याची माहिती डीआयआरने दिली आहे. याप्रकरणी डीआयआरने दोघांना अटक केली असून, त्या दोघांना न्यायालयाकडून २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोल्ड पोटॅशियम डायसायनाईडचा उपयोग धातूंच्या इलेक्ट्रोलाइटिक सोन्याच्या प्लेटमध्ये केला जातो. या मालाचे खरेदीदार मुंबईत मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती डीआरआयने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here