Veer Savarkar : हिंदुत्वाची १०१ वर्षे

मुस्लिम हे मुळातच हिंसक असून त्यांनी त्यांच्या धर्माने सांगितलेल्या मार्गाने विरोध प्रकट केला, असे सांगत गांधीनी मुस्लिमांना सहिष्णुता न शिकवल्याचे खापर हिंदुसमाजावरच फोडले.

300
  • रणजित सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांनी त्यांचा जगप्रसिद्ध हिंदुत्व हा ग्रंथ लिहून आज १०१ वर्षे होत आहेत. इतक्या प्रदीर्घ काळानंतरही या ग्रंथातील विचार आजही तितकेच लागू पडत आहेत. परंतु दुर्दैव हे की त्याकाळी हिंदूंनी याकडे दुर्लक्ष केले आणि आजही बऱ्याच अंशी हेच होत आहे. या ग्रंथाचे आजही महत्त्व का हे जाणून घेण्यासाठी शंभर वर्षांपूर्वीची परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे.

सुमारे १९१९मध्ये केमाल पाशा या तुर्की राष्ट्रवादी नेत्याने तिथल्या खलिफाला हटवून तुर्कस्थानची सत्ता ताब्यात घेतली. या कामी त्याला ब्रिटिशांची मदत होती. याविषयी संपूर्ण मुस्लिम जगत मौन बाळगून असतानाही भारतात मात्र मोहम्मद अली आणि शौकत अली या बंधूंनी खलिफाची पुन्हा गादीवर स्थापना व्हावी यासाठी आंदोलन सुरू केले. खलिफा हा संपूर्ण मुस्लिम जगताचा राजा आणि धर्मगुरू असतो म्हणूनच भारतीय मुसलमानांचाही तो राजा आणि धर्मगुरू आहे ही भूमिका यामागे होती.

(हेही Veer Savarkar : सैनिकीक्षमता कमी झाल्याने १२०० वर्षे पारतंत्र्य आपल्या देशाच्या डोक्यावर बसले – रणजित सावरकर)

शौकत अली हे तेव्हाचे प्रमुख मुस्लिम धर्मगुरू होते आणि त्यांचे धाकटे बंधू मोहम्मद अली हे तेव्हा मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते. वस्तुतः हे आंदोलन भारत बाह्य प्रश्नावर होते आणि आणि तुर्कस्तानच्या जनतेने खलिफाला गादीवरून काढले असल्यामुळे हा पूर्णतः तुर्कस्तानचा अंतर्गत प्रश्न होता. परंतु या मुद्द्याचा उपयोग करून अली बंधूंनी भारतात मुस्लिम राजवटीची स्थापना व्हावी या उद्देशाने खिलाफत चळवळ सुरू केली. ही चळवळ सुरू झाली तेव्हा काँग्रेसचा याला पाठिंबा नव्हता परंतु गांधींनी या आंदोलनाला व्यक्तिशः पाठिंबा देत खिलाफत चळवळीचे नेतृत्व स्वीकारले. मुस्लिम समाज आपल्या मागे उभा रहावा हा त्यांचा यामागचा एकमेव दृष्टिकोन होता.

यावेळी सावरकर (Veer Savarkar) तुरुंगात होते तरीही त्यांनी याविषयी आपली तीव्र चिंता प्रकट करत या आंदोलनामुळे भारताच्या फाळणीची बीजे रोवली जातील, असे मत व्यक्त केले. १९२१मध्ये काँग्रेसने अधिकृतपणे सविनय कायदेभंग चळवळ सुरू करून त्या चळवळीच्या उद्दिष्टांमध्ये तुर्कस्तानमध्ये खिलाफतीची स्थापना करणे हे प्रमुख उद्दिष्ट घातले. सावरकरांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार या आंदोलनाची परिणीती देशभर हिंदूंविरुद्ध दंगली आणि हत्याकांडांमध्ये झाली. केरळमधील मलबार प्रांतांमध्ये एर्नाड आणि वल्लुवानद तालुक्यांमध्ये उघडपणे जिहाद पुकारण्यात आला आणि इस्लामी सत्ता स्थापन करण्यात आली. या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदूंची हत्याकांडे झाली, जबरदस्तीने धर्मांतरे झाली, महिलांवर बलात्कार झाले, त्यांचा एखाद्या वस्तू प्रमाणे विक्री-विनिमय झाला, हिंदूंची देवळे फोडण्यात आली. गावागावातील तलाव आणि विहिरी हिंदूंच्या मृत आणि अर्धमृत देहांनी भरलेल्या होत्या, असे तेथील स्त्रियांनी तत्कालीन व्हॉइसरायच्या पत्नीला पाठवलेल्या पत्रात लिहिले असून त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, स्त्रियांवर सामूहिक बलात्कार तर झालेच पण गर्भवती स्त्रियांची पोटे फाडून गर्भ बाहेर काढण्यात आले. परंतु गांधींनी मात्र या धर्मांध मुस्लिमांचा साधा निषेध न करता, त्यांना ‘माय ब्रेव्ह मोपला ब्रदर्स’ म्हणत सन्मानित केले. मुस्लिम हे मुळातच हिंसक असून त्यांनी त्यांच्या धर्माने सांगितलेल्या मार्गाने विरोध प्रकट केला, असे सांगत गांधीनी मुस्लिमांना सहिष्णुता न शिकवल्याचे खापर हिंदुसमाजावरच फोडले.

(हेही वाचा Veer Savarkar : ‘सावरकर’ हे नुसते आडनाव राहिले नाही, तर जगण्याचा हेतू बनले; बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे गौरवोद्गार)

भारतात त्यावेळी सुमारे २२ टक्के मुस्लिम होते तर ७५ टक्के हिंदू. पण ७५ टक्के असूनही हिंदू जातीपातीत, भाषांमध्ये, प्रांतांमध्ये विभागले गेले असल्यामुळे मुस्लिम आक्रमकतेपुढे ते हतबल ठरले. त्यातच मुस्लिम तुष्टीकरणाच्या नीतीमुळे हिंदूंच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धर्मांतराला कॉंग्रेसने कधीच विरोध केला नाही. या सगळ्यांची परिणीती म्हणजे १९४७ पर्यंत मुस्लिम लोकसंख्या ३५ टक्के इतकी झाली आणि यामुळेच भारताचे विभाजन होऊन आपण आपला एक तृतीयांश भूभाग गमावला.

१९२४ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Veer Savarkar) कारागृहातून सुटका होऊन त्यांना पुढे तेरा वर्षांपर्यंत रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. मुस्लिम तुष्टीकरणामुळे देशाचे विभाजन होण्याचा धोका लक्षात घेऊन या १३ वर्षात सावरकरांनी जात-पात विरहित हिंदू समाज निर्माण करण्यासाठी रत्नागिरीत मोठे हिंदू संघटन आंदोलन चालवले. परंतु त्यांच्यावरील बंधनांमुळे त्यांना बाहेर कार्य करणे शक्य नसल्याने हिंदू समाजाने उर्वरित भारतात त्यांच्या विचारांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. १९४७ नंतर काँग्रेसनेही केवळ सत्तेसाठी ब्रिटिशांचे डिव्हाइड अँड रुल हे धोरण अवलंबत भारतातील हिंदूंमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडण्याचे राजकारण केले.

भारताची फाळणी झाल्यावर, विभाजित भारतात मुस्लिम लोकसंख्या आठ टक्के होती आणि हिंदूंची ९० टक्के. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या सुमारे १८ टक्के होती. भारतात १९४७ मध्ये ८% असलेली मुसलमान लोकसंख्या आज २२ टक्क्यांवर पोहोचली आहे तर हिंदू लोकसंख्या ७५ टक्क्यांवर. म्हणजेच १०० वर्षात दुर्भाग्याचे हे वर्तुळ पुन्हा पूर्ण होऊन आपण १९२१ च्या परिस्थितीला पोहोचलो आहोत.

(हेही वाचा Veer Savarkar : ‘अंदमानात त्यांचा आत्मा माझी वाट पाहात आहे’, अभिनेता रणदीप हुड्डा भावना व्यक्त करताना म्हणाला…)

दुर्दैवाने पाकिस्तानमध्ये असलेली तेव्हाची १८ टक्के हिंदूंची लोकसंख्या आज एक टक्क्याच्या खाली आली असून १९४७ नंतर सुमारे ७० लाख हिंदूंची तिथे कत्तल झाली, लाखोंची धर्मांतरे झाली. बायकांचे, विशेषता १०-११ वर्षांवरील मुलींचे आजही तिथे राजरोस अपहरण होत आहे. अशी परिस्थिती असताना आजही भारतात हिंदू जातीपातीत विभागलेलाच आहे आणि त्याचा फायदा इथले कट्टर मुस्लिम घेत असून पुढच्या पंधरा ते वीस वर्षांत आम्ही भारतात इस्लामी राजवट आणू आणि इथल्या हिंदूंना नामशेष करू अशा उघड वल्गना करत आहेत.

आणि म्हणूनच आजही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) ‘हिंदुत्व’ पुस्तकात दिलेला हिंदू संघटनाचा मंत्र अवलंबला नाही तर भविष्यात हिंदूंना नामशेष होण्यावाचून पर्याय उरणार नाही. १९४७ मध्ये पाकिस्तानात हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार झाले आणि जे आजही होत आहेत ते तुमच्या मुलाबाळांच्या नशिबी येऊ नये असे वाटत असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर प्रणित हिंदुत्वाचा स्वीकार करणे आवश्यक आहे.

(लेखक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.