Veer Savarkar : ‘१० फेब्रुवारी’ वीर सावरकर यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना

524
सुट्टीमध्ये एकदा भेट द्यायलाच हवी असे ठिकाण Sanjay Gandhi National Park
सुट्टीमध्ये एकदा भेट द्यायलाच हवी असे ठिकाण Sanjay Gandhi National Park
  • चंद्रशेखर साने
१० फेब्रुवारी १९४० 
हिंदू महासभेचे ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये व्हाइसरॉयच्या घोषणेतील सर्व पक्ष नि हितसंबंधी यांचे समवेत चर्चा करण्याची योजना, संयुक्त राष्ट्रसंघटनेचा (फेडरेशन) फेरविचार करण्याची सिद्धता आणि महाराज्यपालांचे कार्यकारी मंडळ व्यापक करण्याची सूचना, हे तीन ठराव संमत करण्यात आले.
  • या तीन गोष्टींचा संपूर्ण स्वातंत्र्याच्या मार्गातील एक टप्पा म्हणून प्रतियोगी सहकारितेच्या तत्त्वानुसार सहाय्यकारी दृष्टीने विचार करावयास हिंदुमहासभेचे कार्यकारी मंडळ सिद्ध आहे. घटनात्मक प्रगतीच्या मार्गात अल्पसंख्यांकांचा प्रश्न ही एक धोंड उभी करण्यात आली आहे. पण तो प्रश्न राष्ट्रसंघाकडे लवादासाठी सोपवावा असे हिंदुमहासभेचे निश्चित मत आहे.
  • संरक्षणासंबंधी हिंदुमहासभेचे असे मत आहे की शक्य तितक्या लवकर भूदल, नौदल नि वायुदल यांचे हिंदीकरण करण्यात यावे. जिना नि व्हाइसरॉय यांचेमधील पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला. यासंबंधी हिंदुसभेला समाधान वाटले. कारण त्यामुळे एकीकडे हिंदी सैन्य मुसलमानी राष्ट्राविरुद्ध नये असे म्हणून आणि दुसरीकडे हिंदी सैन्यातील मुसलमानांचे प्रमाण न घटविण्याचा हट्ट धरून मुस्लीम लीगने बाहेरच्या मुस्लीम राष्ट्राबरोबर चालविलेल्या कारस्थानांवर चांगला प्रकाश पडला आहे. ही त्यांची वृत्ती लक्षात घेऊन हिंदुसभेची अशी मागणी आहे की सैन्यातील मुसलमानांची संख्या त्यांच्या लोकसंख्येशी प्रमाणशीर होईपर्यंत सैन्यात नवे मुसलमान भरती करू नयेत.
  • दुसऱ्या एका ठरावाने, कलकत्ता अधिवेशनात ठरल्याप्रमाणे हिंदुसैनिकदल उभारण्यासाठी नऊ जणांची एक समिती नेमण्यात आली. त्यावाचून मंझलगा प्रकरण, सरसीमेवरील बंडाळी, नभोवाणीवरील उर्दूमिश्रित हिंदीला विरोध, हिंदुसभेच्या प्रचारासाठी परदेशात शिष्टमंडळ पाठविणे आणि धर्मवीर भोपटकर यांच्या षष्ठयब्दीपूर्तीसाठी महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेल्या समितीला पाठिंबा असे ठराव संमत करण्यात आले.

(हेही वाचा : Veer Savarkar : हिंदु राष्ट्रासाठी मशाल पेटवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर)

१० फेब्रुवारी १९४२

हिंदू संघटन आणि सैनिकीकरण

१० फेब्रुवारी १९४२ ला गिरगाव चौपाटी भागात पालिका-पोटनिवडणूक होणार होती म्हणून १ फेब्रुवारीला हिंदूंची “शक्तिकेंद्रे” या विषयावर त्र्यंबक वैद्याच्या वाडीत धर्मवीर अनंतराव गद्रे यांच्या अध्यक्षतेखाली सावरकरांनी (Veer Savarkar) एक भाषण दिले. या भाषणात त्यांनी स्वतंत्र हिंदुराज्य नेपाळ आणि हिंदूंचे संख्याबळ ही दोन्ही हिंदूंची शक्तिकेंद्रे कशी आहेत यांचे विवरण केले. ते म्हणाले, “पाच वर्षापूर्वी माझी रत्नागिरीमधून सुटका झाली तेव्हा पुण्यातही भगवा ध्वज लावून मिरवणुका काढणे शक्य नव्हते. तेव्हा हिंदुसमाजाची मृत्यूकेंद्रेच तेवढी मोजली जात होती. पण आज पाच वर्षात परिस्थिती इतकी पालटली आहे, हिंदुध्वजाखाली लढून हिंदूंचे अधिकार मिळवायचे या विचारानेच कृतनिश्चयी गट भारतात ठिकठिकाणी संघटित होत आहेत. ठोशास ठोसा ही आपली नीती जशी खरी आहे त्याचप्रमाणे पक्षाने सहकारासाठी हात पुढे केला असता, आपल्याच नाकावर ठोसे मारीत न बसता त्याचा हात हाती धरणे ही प्रतिसहकाराची नीती लक्षात घेऊन आपण सैन्यात शिरून ही हिंदुजाती समर्थ नि युद्धकुशल बनविली पाहिजे.

१० फेब्रुवारी १९४२ 
चँग कै शेक आणि सावरकर 

चीनचे नेते मा. चँग कै. शेक भारतात आले. सावरकरांनी (Veer Savarkar) त्यांना, “खंबीर चिनी पुढारी म्हणून हिंदुराष्ट्रांच्या वतीने हिंदुमहासभा आपले स्वागत करते, समानधर्मी नि मित्रराष्ट्र चीनला आमच्या शुभेच्छा कळवा.” अशी तार पाठवून शुभेच्छा व्यक्त केली.

१० फेब्रुवारी १९४३

गांधींचे उपोषण

१० फेब्रुवारी १९४३ ला स्थानबद्ध गांधींनी आगाखान राजवाड्यात मर्यादित उपोषणाला प्रारंभ केला. पुण्याचे एक विचारवंत हिंदुत्वनिष्ठ लेखक प्रा. श्री. म. माटे यांनीही सावरकरांना (Veer Savarkar) तार करून गांधींचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्या ऐकण्यात असलेल्या हिंदु मत्र्यांना राजीनामा देण्यास सांगावे अशी  विनंती केली.

१० फेब्रुवारी १९४९

सावरकरांची निर्दोष मुक्तता

१० फेब्रुवारी १९४९ ला गांधी हत्या अभियोगाचा निर्णय लागून माननीय न्यायालयाने हिंदुहृदयसम्राट सावरकरांना (Veer Savarkar) संपूर्ण निर्दोष ठरवले आणि त्यांची त्वरीत मुक्तता करण्याचे आदेश दिले. सावरकरांचा दिल्लीत सत्कार होईल, मिरवणुक निघेल या भीतीने दिल्ली शासनाने सावरकरांना २ तासात दिल्ली सोडण्याचे आदेश दिले. त्याशिवाय पुढील तीन महीने दिल्लीत प्रवेश करण्यासही मनाई हुकूम बजावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.