दिल्ली रेल्वे स्थानकांवरून ११ बोगस टीटीईंना अटक! १५ दिवस ड्युटी, तरीही कोणाला पत्ता नाही

155

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील सर्वात महत्वाच्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ११ बोगस टीटीई ड्युटी करताना पकडण्यात आले. हे आरोपी १५ दिवस स्थानकावर ड्युटी करत होते आणि त्याचा कोणलाच पत्ता नव्हता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, आरपीएफने या ११ बोगस टीटीई आरोपींना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

(हेही वाचा – फोनवर बोलताय? जरा सांभाळा! Vodafone-Idea च्या २ कोटी ग्राहकांना बसला फटका)

मिळालेल्या माहितीनुसार, १५ दिवसांपासून हे ११ बोगस टीटीई दिल्लीतील रेल्वे स्थानकावर ड्युटी करत होते. पांढरा शर्ट व काळी पँट परिधान करून हे आरोपी तिकीट तपासणीचे काम करत होते. रेल्वे अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तीन तरूणांना अटक करण्यात आली आहे. आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी या ११ बोगस तिकीट तपासांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. बाकी असलेल्या भूमिकेबाबत तपास सुरू आहे.

अशीही माहिती मिळतेय की, मंगळवारी रेल्वे अधिकारी रितेश वाधवा कानपूर शताब्दी येथून प्रवास करत होते. ट्रेन गाझियाबादला पोहोचली तेव्हा त्यांना एक व्यक्ती तिकीट तपासताना दिसली. चौकशीमध्ये त्यांना संशय आला. त्यानंतर त्याला नवी दिल्ली स्थानकात पकडण्यात आले असून गोरखपूर येथील भूपेंद्र चौरसिया असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अशाच आणखी १० तरुणांना पकडण्यात आले. यापैकी काहींकडे बनावट नियुक्तीपत्रे, आयडी होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.