दिवाळी, छठपूजा संपवून परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; 11 जण ठार

135

मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यामधील झल्लार भागात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात आलेल्या कारने बसला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या भीषण अपघातात 5 पुरुष, 4 महिला आणि 2 लहान मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

(हेही वाचा – Twitter Down: जगभरातील अनेक भागात ट्विटर डाऊन! युजर्स हैराण, अकाऊंट ऍक्सेस करण्यात अडचणी)

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व जण अमरावतीहून आपापल्या घरी परतत होते. कार चालकाला डुलकी लागली आणि कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला समोरा-समोर धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच बैतूलचे जिल्हाधिकारी आणि एसपीसह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

बैतूल परतवाडा रस्त्यावरील झल्लार गावात झालेल्या या दुर्घटनेबाबत बैतूलचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झल्लार परिसरात बस क्रमांक एमपी 48 पी 0193 आणि कार यांच्यात धडक झाली. गाडीतील सर्व लोक मजूर आहेत, हे सर्वजण महाराष्ट्रातील कळंबा येथून आपल्या गावाकडे जात होते. महाराष्ट्रात काम करणारे हे मजूर दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त आपापल्या घरी गेले होते आणि हा सण संपवून गाडीने परतत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.