तामिळनाडूच्या तंजोर येथे बुधवारी सकाळी मंदिरातील मिरवणुकी दरम्यान विजेचा धक्का लागून 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. या अपघातात 14 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर तंजोर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपाचर सुरू आहेत.
( हेही वाचा: पामतेल 25 रुपयांनी महागले: फरसाण, वेफर्सचेही दर वाढणार )
अन्यथा अपघाताचे स्वरूप आणखी भयावह असते
यासंदर्भातील माहितीनुसार, तंजोर येथील मंदिरात 94 वा गुरुपूजा उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने मंगळवारी 26 एप्रिल रोजी रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान आज, बुधवारी सकाळी पारंपारिक रथयात्रा काढण्यात आली. भाविक देवाचा रथ ओढून नेत असताना रथाला विद्युत तारेचा स्पर्श होऊन 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमारे 14 जण जखमी झाले असून, त्यांना तंजोर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, रथ ओढताना परिसरात पाणी साचल्यामुळे सुमारे 50 भाविकांनी रथ ओढणे सोडून दिले होते, अन्यथा अपघाताचे स्वरूप आणखी भयावह झाले असते.