जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये भीषण अपघात, बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. येथे बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस पुंछ जिल्ह्यातील सौजियान येथून मंडीकडे जात असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर स्थानिक लोकांनी पोलीस आणि लष्कराला माहिती दिली आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – 75 रुपयांत सिनेमा बघण्यासाठी आता अजून आठवडाभर थांबावं लागणार)

जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पुंछ दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना चांगले उपचार देण्याचेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

गेल्या महिन्यात 31 ऑगस्ट रोजी कटराहून दिल्लीला येणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसला कटरा येथे अपघात झाला होता. या बसला आणखी एका बसची धडक बसली. या अपघातात 5 वर्षाच्या चिमुरड्याचा वेदनादायक मृत्यू झाला. यामध्ये 16 भाविक जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्लीहून सुमारे 35 भाविकांनी भरलेली ही बस माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आली होती आणि कटराहून दिल्लीला परतत असताना त्यांचा अपघात झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here