मुंबईत दहीहंडीचा मनोरा उभारताना १२ गोविंदांना दुखापत

225

गेल्या दोन वर्षांत कोरोनाचा संसर्ग असल्याने सगळ्याच सण-उत्सवांवर निर्बंध होते. राज्यात शिंदे-भाजपची सत्ता येताच दहीहंडी उत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने मुंबईसह राज्यात ठिक-ठिकाणी दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी मनोरा तयार करताना 12 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 5 जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 7 जण रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती BMC ने दिली आहे.

(हेही वाचा – मुंबईची जीवनवाहिनी BEST अधिक बळकट होणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही)

गोविंदांना मिळणार मोफत उपचार

दरम्यान आज, शुक्रवारी दहीहंडी असून कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोविंदाना विमा संरक्षण मिळणार 

दहीहंडी उत्सवातील गोविंदाना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दहीहंडी उत्सवात जर कोणत्या गोविंदा पथकाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्या गोविंदाना 7 हजार 50 लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पायाला दुखापत झालेल्या किंवा जखमी झालेल्यांना 5 लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.