ट्वीटरचा ताबा घेतल्यानंतर एलाॅन मस्क यांनी कंपनीच्या कर्मचा-यांसाठी नवीन नियम केला आहे. त्यानुसार, कर्मचा-यांना एका दिवसात 12 तास तसेच, आठवड्यात 7 दिवस काम करावे लागणार आहे. नियम मोडणा-यास नोकरीवरुन काढण्यात येणार आहे. ट्विटरमध्ये बदल घडवण्यासाठी एलाॅन मस्क यांनी कठोर डेडलाइन ठरवली आहे. त्यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत.
( हेही वाचा: घरात सोने ठेवताय? तर ‘हे’ नियम तुम्हाला माहिती हवेत )
7 नोव्हेंबरची डेडलाइन
मिळालेल्या माहितीनुसार, एलाॅन मस्क यांनी ट्विटर ब्ल्यू सबस्क्रिप्शनचे मूल्य वाढवण्याची योजना बनवली आहे. तसेच, ब्लू टिक पडताळणीच्या प्रक्रियेतही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक बदल करण्यासाठी ट्विटरच्या अभियंत्याला 7 नोव्हेंबरची डेडलाइन देण्यात आल्याचे समजते. 7 तारखेपर्यंत देय पडताळणीचे फिचर लाॅंच करा, अन्यथा घरी जा, असा दमच मस्क यांनी अभियंत्यांना भरला असल्याचे समजते. इतर बदलांसाठीही हीच डेडलाईन असल्याचे समजते.
अधिक महसूलाची गरज
- मिळालेल्या माहितीनुसार, मस्क यांना ब्ल्यू टिक बजद्वारे पैसे कमवायचे आहेत. बॅजच्या किमतीवरुन मस्क यांच्यावर टीका होत आहे.
- आधी सबस्क्रिप्शनसाठी 19.99 डाॅलरचे शुल्क ठेवण्याचा ट्विटरचा विचार होता. मात्र, टीकेनंतर मस्क यांनी 8 डाॅलर म्हणजेच 660 रुपये करण्यावर सहमती दर्शवलीस असे समजते.