कोरोनाकाळात लॉकडाऊन असल्यामुळे अनेक कुटुंबांचे हाल झाले. व्यवसाय, दैनंदिन कामकाज ठप्प झाल्यामुळे जगायचे कसे हा प्रश्न सामान्य जनतेसमोर निर्माण झाला होता. परिणामी, पालकांसमोरील वाढलेल्या अडचणी, वयात आलेल्या मुलीची चिंता, यातून राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढू लागले आहे.
२१ वर्षे झाल्याशिवाय विवाह लावणे गुन्हा
एप्रिल २०२० ते १६ एप्रिल २०२२ पर्यंत राज्यभरात जवळपास बाराशे बालविवाह रोखण्यात आले आहेत. त्यात सोलापूर अव्वल असून २०२२ मधील १६ बालविवाहांसह अडीच वर्षांत सोलापूर जिल्ह्यातच तब्बल १४१ बालविवाह रोखले आहेत. आता नव्या कायद्यानुसार, मुलीचे व मुलाचे वय २१ वर्षे झाल्याशिवाय विवाह लावणे गुन्हा आहे.
( हेही वाचा : तुमचाही फोन हरवलाय? तर ‘बेस्ट’ची यादी वाचाच )
कोरोनाकाळात कायद्याने बंद झालेली बालविवाहाच्या प्रथेने पुन्हा डोके वर काढले आहे. चाईल्ड लाईनवरुन मिळालेल्या माहिती किंवा तक्रारीवरून बालसंरक्षण समिती व पोलिस अधिकारी बालविवाह रोखतात. पण, गुपचूप पद्धतीने उरकलेल्या बालविवाहाचे काय, याचे उत्तर कोणाकडेच नाही. शालेय शिक्षण विभाग, बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हे केल्यास गुपचूप झालेल्या बालविवाहाची वस्तुनिष्ठ माहिती समोर येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Join Our WhatsApp Community