विविध खोटी अमिषे दाखवून किंवा प्रलोभने देऊन हिंदू धर्मीयांचे सर्रास धर्मांतर केले जाते. मात्र आता त्या हिंदूंची घरवापसी सुरु आहे. छत्तीसगडमध्ये तीनशे ते चारशे कुटुंबातील हिंदूंनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. जातीयवाद, समानता, गरिबी अशा अनेक कारणांमुळे लोक धर्मांतराकडे वळतात. या लोकांना धर्मात समाविष्ट करण्याच्या हेतूने छत्तीसगडमधील जशपूरमध्ये भाजपचे दिवंगत नेते दिलीप सिंह जुदेव यांचा मुलगा प्रबल प्रताप सिंह यांनी धर्मांतर केलेल्या बाराशे हिंदूंना त्यांचे पाय धुवून त्यांना हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश करण्यात आला आहे.
ट्विटरवर सकारात्मक प्रतिक्रिया
छत्तीसगडमधील लोकांचे धर्मांतर मिशनर्यांनी केले होते. जे लोक परत धर्मात येत आहेत, त्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि गरिबी, जातिवाद यांपैकी कोणतेही कारण या धर्मांतरामागे असले, तरी त्यांच्या पुढील जागृतीसाठी प्रकाश टाकला गेला पाहिजे. असे ट्विट अंशुल सक्सेना याने केले आहे. धर्मांतराचे मूळ कारण ओळखून परत आलेल्या या लोकांना कोणताही गाजावाजा न करता मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे. अशा आशयाच्या सकारात्मक प्रतिक्रिया ट्विटरवर आल्या आहेत.
1,200 people from 300-400 families reconvert to Hinduism in Chhattisgarh.
These people were converted by missionaries.
People who are coming back, their problems should be resolved and also highlighted for the awareness, whether it's poverty, casteism or any other reason.
— Anshul Saxena (@AskAnshul) November 21, 2021
( हेही वाचा : पुन्हा रंगला नवाब मलिक आणि क्रांती रेडकर यांचात सामना )
धर्माचा व्यापार केला
प्रबल प्रताप म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने लोक त्यांच्या मूळ धर्मात परतणे हे चांगले लक्षण आहे. एखाद्याच्या गरिबीच्या मजबुरीचा फायदा घेऊन केलेले काम कधीच टिकणारे नसते. मिशनर्यांनी शिक्षण आणि आरोग्याच्या नावाखाली धर्माचा व्यापार केला होता, पण आम्ही या कारस्थानांचा पर्दाफाश करत राहू, या सर्व लोकांनी तीन पिढ्यांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. हिंदुत्वाचे रक्षण करणे हाच जीवनाचा संकल्प आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community— Yogesh Mishra (@YogeshMishraK) November 21, 2021