मुंबईतील भायखळा रेल्वेस्थानकाला नवे रुप लाभले आहे. गेल्या चार वर्षांपासून या स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून हे काम एका स्वयंसेवी संस्थेने पूर्ण केले आहे. याची देखभाल आता मध्य रेल्वेमार्फत करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : जुनी मुंबई कशी होती? बॉम्बे ते मुंबई असा उत्कंठावर्धक प्रवास आमच्या मुंबईचा… )
चार वर्षांपासून या स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम
या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार, २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता भायखळा रेल्वे स्थानक, फलाट क्रमांक १ येथे होणार आहे. ‘आय लव्ह मुंबई बजाज ट्रस्ट ग्रुप’च्या सहकार्याने हेरिटेज कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट आभा लांबा आणि कैस कन्स्ट्रक्शन यांनी एकत्रितपणे भायखळा स्थानकाच्या सुशोभीकरणाचे आणि पुनरोद्धाराचे काम २०१८ मध्ये हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पाची सुरुवात तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटनाने झाली.
अतिरिक्त बांधकामे हटवली
दरवाजे, खिडक्या दुरूस्त करून अतिरिक्त बांधकामे हटविण्यात आली आहेत तसेच स्थानकातील छताची रचना पुरातन वास्तूप्रमाणे करण्यात आली आहे. हा प्रकल्प 18 महिन्यांत पूर्ण करायचा होता. मात्र, कोरोना महामारीमुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास 3 वर्षे लागली आहेत.
Join Our WhatsApp Community