रजनीकांत (Rajinikanth) म्हणजेच शिवाजीराव गायकवाड हे भारतीय चित्रपट सृष्टीतले एक प्रसिद्ध अभिनेता आहेत. ते मुख्यतः तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करतात. दक्षिण भारतात विशेषत: तमिळनाडूमध्ये त्यांची देवता म्हणून पूजा केली जाते.
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका निभावल्या. त्यानंतर ते हळूहळू एक प्रस्थापित अभिनेता म्हणून उदयास आले. काही वर्षांतच ते तमिळ चित्रपटसृष्टीतले एक महान लोकप्रिय कलाकार बनले. तेव्हापासूनच रजनीकांत (Rajinikanth) हे भारताच्या संस्कृतीमध्ये एक लोकप्रिय आयकॉन म्हणून राहिले.
त्यांची अभिनयाची खास शैली आणि संवाद बोलण्याची खास पद्धत हे त्यांच्या लोकप्रियतेचं आणि आकर्षणाचं प्रमुख कारण आहे. इतर भारतीय प्रादेशिक चित्रपट सृष्टींमध्ये काम करण्याव्यतिरिक्त रजनीकांत हे युनायटेड स्टेट्समधल्या चित्रपटांसोबतच इतर राष्ट्रांच्या चित्रपटांमध्ये देखील झळकले आहेत. शिवाजी नावाच्या चित्रपटात त्यांच्या अभिनयासाठी त्यांना २६ कोटी रुपये मानधन देण्यात आलं. तेव्हा ते जॅकी चॅननंतर आशियामधले सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता बनले.
रजनीकांत यांचा चित्रपट प्रवास
रजनीकांत (Rajinikanth) यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात तमिळ चित्रपट अपूर्व रागांगल नावाच्या चित्रपटाद्वारे केली.
१९७८ साली त्यांनी तमिळ, तेलुगु, कन्नड भाषेतल्या २० वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर ते पी. माधवशंकर यांचा सलीम सायमन नावाच्या चित्रपटात दिसले. पुढे ते १९८० सालच्या उत्तरार्धात कन्नड चित्रपटात दिसले.
मग रजनीकांत (Rajinikanth) यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी नान शिगप्पू अनिथन, पडिककथवन, श्री भारत या चित्रपटात चित्रपटांत काम केलं. तसंच व्लाइकरण, गुरु शिष्यन आणि धर्मथिन थलायवन असे अनेक चित्रपट करून त्यांनी ते दशक गाजवलं.
१९८८ साली ड्वाइट लिटिल यांनी दिग्दर्शित केलेल्या तमारा नावाच्या चित्रपटात त्यांनी इंग्रजी भाषिक भारतीय टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका केली होती. रजनीकांत यांनी धधी दाझ, शिवा, राजा चिन्ना रोजा आणि मॅपिल्लई या चित्रपटांमध्येही भूमिका केल्या होत्या. राजा चिन्ना रोजा हा लाइव्ह ॲक्शन आणि ॲनिमेशन दाखवणारा पहिला भारतीय चित्रपट होता.
रजनीकांत यांचं वैयक्तिक जीवन
रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० साली म्हैसूर, बंगळुरू येथे हेंद्रे पाटील नावाच्या महाराष्ट्रीयन मराठा कुटुंबात झाला. रजनीकांत यांचं पूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड असं आहे. त्यांच्या वडिलांचं नाव रामोजीराव गायकवाड आणि आईचं नाव जिजाबाई गायकवाड असं होतं. रजनीकांत यांचं लग्न २६ फेब्रुवारी १९८१ साली तिरुपती, आंध्र प्रदेश येथे लता रंगाचारी यांच्याशी झाला.
रजनीकांत यांचं राजकीय जीवन
रजनीकांत यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ राजकारणातही घालवला. यापूर्वी त्यांनी कधी द्रमुक तर कधी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे.
३१ डिसेंबर २०१७ साली त्यांनी जाहीर केलं की, ते २०२१ साली तमिळनाडू विधानसभेची निवडणूक लढवतील आणि सर्व २३४ जागांवर उमेदवार उभे करतील. रजनीकांत यांनी १२ जुलै २०२१ साली त्यांचा रजनी मक्कल मंद्रम म्हणजेच RMM नावाचा पक्ष विसर्जित केला. ते असंही म्हणाले की, भविष्यात त्यांचा राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही. रजनीकांत यांना आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि लोकप्रियतेसाठी कित्येक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत.