Ayodhya: राम मंदिराच्या १४ दरवाजांना सुवर्णझळाळी, पुणेकर करणार शंखनाद; कशी सुरू आहे तयारी? वाचा सविस्तर…

दिल्लीत या दरवाजांना सोन्याचा मुलामा देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

193
Ayodhya: राम मंदिराच्या १४ दरवाजांना सुवर्णझळाळी, पुणेकर करणार शंखनाद; कशी सुरू आहे तयारी? वाचा सविस्तर...
Ayodhya: राम मंदिराच्या १४ दरवाजांना सुवर्णझळाळी, पुणेकर करणार शंखनाद; कशी सुरू आहे तयारी? वाचा सविस्तर...

अयोध्येत (Ayodhya) रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. कोट्यवधी हिंदुंचं श्रद्धास्थान असलेल्या रामजन्मभूमीची तयारी सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे. राम मंदिरातील तळमजल्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मंदिराच्या तळमजल्यावरील १४ दरवाजे विदर्भातून आणलेल्या सागवान लाकडापासून बनवले आहेत. त्यावर तांब्याचा लेप करण्यात आला आहे. त्यांना सोन्याचा मुलामा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

राम मंदिराच्या तळमजल्यावरील १४ दरवाजे हैदराबाद येथील कंपनीचे कन्याकुमारी, तामिळनाडू येथील कामगार तयार करत आहेत. या दरजावाजांचे वैशिष्ट्य म्हणजे हे दरवाजे सोन्याने जडवलेले आणि सुंदर कोरीव डिझाईन असतील. आता दरवाजांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दिल्लीत या दरवाजांना सोन्याचा मुलामा देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या दरवाजांवर भव्यतेचे प्रतीक गज (हत्ती), सुंदर श्रीविष्णू कमळ, स्वागताच्या मुद्रेतील देवीच्या प्रतिमा कोरल्या आहेत.

(हेही वाचा – Deepak Kesarkar : इंद्रायणीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा – दीपक केसरकर )

दरवाजांचे अनोखेपण…
गर्भगृहाच्या दरवाजाची उंची ८ फूट असून दरवाजाची रुंदी १२ फूट आहे, तर इतर दरवाजांची उंची केवळ ८ फूट आहे. दरवाजाची रुंदी एकामेकांपेक्षा वेगळी आहे, जी १२ फुटांपेक्षा कमी आहे. गरज असेल तेव्हा दरवाजा अर्धा किंवा पूर्णपणे उघडला जाऊ शकतो.

१३ दिवस विशेष अभियान, पुणेकरांचा सहभाग
– प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांनी तयार केलेले वस्त्र वापरले जाणार आहे. त्यासाठी १३ दिवस हे अभियान राबवण्यात येणार आहे. त्यात १० लाख लोकांनी सहभाग घेतला आहे.
-‘दो धागे श्री राम के लिए’ या अभियानाअंतर्गत श्रीराम मंदिरातील भगवान रामाकरिता वस्त्र तयार करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील मंडळींचा सहभाग आहे.
-पुणे शहरातील मंडळी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी शंखनाद करणार आहेत. त्यासाठी केशव शंखनाद टीमच्या १११ जणांना शंक वाजवण्याकरिता श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे महासचिव चंपत राय यांनी आमंत्रण दिले आहे.
– मंदिराचा प्राणप्रतिष्ठा समारंभ १८ जानेवारी रोजी सुरू होणार आहे. त्यानंतर २२ जानेवारी रोजी मंदिरात भव्य समारंभ होणार आहे. यासाठी पुणे शहरातील केशव शंखनाद टीमचे १११ जण जाणार आहेत.

हेही पहा – 

 


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.