बांगलादेशमध्ये अज्ञातांनी हिंदू मंदिरांवर हल्ला केला आहे. 14 मंदिरांवर हा हल्ला केला असून, मंदिरातील सर्व मूर्तींची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अज्ञातांनी अंधाराचा फायदा घेत 14 मंदिरांतील मुर्तींची नासधूस केली आहे, अशी माहिती बालिंदंगी येथील हिंदू समाजाचे नेते बिद्यनाथ बर्मन यांनी दिली आहे.
उपजिल्हा पूजा सेलिब्रेशन काऊन्सिलचे सरचिटणीस बर्मन यांनी सांगितले की, काही मूर्ती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तर काही मूर्ती मंदिराच्या ठिकाणी तलावात फेकून देण्यात आल्या होत्या. यामागे नेमके कोण आहे हे अद्याप उघड झालेले नाही. परंतु तपास पूर्ण करत आरोपींना पकडले जावे आणि न्याय व्हावा अशी आमची इच्छा आहे, असे बर्मन म्हणाले आहेत.
( हेही वाचा: भुकंपाने हादरलं तुर्की; 7.9 रिश्टर स्केलचा भूकंप, मोठी जीवितहानी झाल्याची भीती )
देशातील शांतता बिघडवण्यााठी केला हल्ला
हिंदू समाजाचे नेते आणि युनिअन परिषदेचे चेअरमन समर चॅटर्जी यांनी सांगितले की, हा परिसर नेहमीच आपल्या जातीय सलोख्यासाठी ओळखला जातो. याआधी अशी कोणतीही निंदनीय घटना घडलेली नाही. याठिकाणी मुस्लिम समाज बहुसंख्यांक असून, त्यांचा हिंदूंसह कोणताही वाद नाही. यामागे नेमके आरोपी कोण आहेत, हे आम्हालाही समजत नाही आहे, असे ते म्हणाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आणि रविवारदरम्यान हे हल्ले झाले आहेत. ठाकूर गावचे पोलीस प्रमुख जहांगीर हुसैन यांनी एका मंदिराच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, देशातील शांतता बिघडवण्यााठी हा आकस्मिक हल्ला केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
Join Our WhatsApp Community