दक्षिण आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जोहान्सबर्ग येथील बारमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्गच्या सोवेटो टाऊनशिपमधील बारमध्ये हा गोळीबार झाला आहे. जोहान्सबर्गच्या सोवेटो टाउनशिपमधील एका बारमध्ये शनिवारी उशिरा ही घटना घडली. मिनीबसमधून आलेल्या काही सशस्त्र लोकांनी प्रथम बारच्या रक्षकांवर गोळीबार केला. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर हल्लेखोरांनी गोळीबार केला.
(हेही वाचा – ‘परदेश वारी’ची सुवर्णसंधी! फक्त २६ रूपयांत ‘हवाई’सफर; ‘या’ तारखेपर्यंतच भन्नाट ऑफर)
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे आणि शेल सापडले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी सामूहिक गोळीबार 21 मार्च 1960 रोजी झाली. त्यावेळी वर्णभेद कायद्याच्या विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या कृष्णवर्णीयांवर गोळीबार करणाऱ्या पोलिसांनी 69 जणांचा बळी घेतला.
Join Our WhatsApp Community