जगातील ‘हे’ 15 देश हिंदू राष्ट्र होण्यासाठी सज्ज! …पण भारताने पुढाकार घ्यावा

163

पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळ्यात मकर संक्रांतीनिमित्त आलेले पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी एक दावा केला आहे. या दाव्यानुसार, मॉरिशस, भूतानसह जगातील १५ देश हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तयार आहेत. पण भारताने पुढाकार घेऊन सुरुवात करावी. हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेवर भर देत शंकराचार्य पुढे म्हणाले की, 52 देशांच्या उच्च प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यासंदर्भात बोलणे झाले आहे. यापैकी 15 देशांनी असे म्हटले की, भारताने स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केल्यास ते देश पुढे येण्यास तयार असतील.

नेपाळ चीनच्या इशाऱ्यावर

शंकराचार्य मकर संक्रांतीनिमित्त गंगासागर येथे शाही स्नान करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले होते. जगातील एकमेव हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळबद्दल बोलताना स्वामी निश्चलानंद म्हणाले, नेपाळ आता चीनच्या दबावात आले असून त्यांच्या इशाऱ्यावर चालले आहे. त्यामुळे नेपाळबाबत भारताच्या परराष्ट्र धोरणातही बदल झाला आहे.

(हेही वाचा- खऱ्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमण अन् मंत्र्याच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांच्या नावांचा देखावा!)

बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य केल्यानं व्यक्त केली नाराजी

शंकराचार्यांनी बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करणे आणि देवतांशी छेडछाड केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी ते म्हटले की त्यांचे अस्तित्व भारतामुळे आहे हे विसरू नका. हिंदू देवतांचा अपमान जगातील कोणत्याही कोपऱ्यात खपवून घेतला जाणार नाही. जर मुस्लिम भारतात आरामात राहू शकतात तर पाकिस्तानात हिंदूंना का लक्ष्य केले जात आहे, असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थितीत केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.