संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालय संतापले!

161

गेले अनेक दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच एसटी संपाच्या विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ हवी असल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर यासंदर्भात अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. परंतु या दरम्यान उच्च न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना फटकारले आहे.

( हेही वाचा : मुंबई महापालिकेचे हे सहआयुक्त यांची नाशिक आयुक्त पदी नेमणूक )

एसटी कर्मचाऱ्यांना फटकारले

विलीनीकरणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना कर्मचारी कामावर का हजर होत नाहीत असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला संपकरी कर्मचारीवर्ग व संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना केला आहे.  राज्य सरकारने अर्थ संकल्पीय अधिवेशनामुळे यासंदर्भात निर्णय घेण्यास उशीर झाला याची कबुली दिल्यावर, एसटी विलीनीकरणावर १ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करत ५ एप्रिलला होणाऱ्या सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहे. मुदतवाढ देताना ही शेवटची संधी असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे

ईडीच्या सतत होणाऱ्या कारवाईमुळे परिवहन मंत्र्यांना वेळ नाही. परिवहन मंत्र्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्याबद्दल निर्णय घ्यायला वेळ नाही, अशी टीका सदावर्तेंनी केली. १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावर देखील सरकारला जाग येत नाही. सरकार केवळ वेळकाढूपणा करत असून सरकारला आज न्यायालयात बाजू मांडता आली नाही. न्यायालयाने सरकारला कर्मचाऱ्यांच्याप्रती सहानुभूतीने विचार करण्याचा सल्ला दिला, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

कर्मचारी संपावर ठाम

संपकरी कर्मचाऱ्यांचा विचार करताना, एसटीविना प्रवाशांचे होणारे हाल याचा विचार कोण करणार असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. तसेच कोरोनामृत्यूबाबत कर्मचाऱ्यांचे जे ३५० अर्ज आले आहेत त्यांच्या मानवतेच्या दृष्टीने विचार करा असेही न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाकडून त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. पण एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण शक्य नाही, असे या अहवालातून समोर आले आहे. तरीही कर्मचारी संपावर ठाम असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी सेवा ठप्प आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.