दिवाळी काही दिवसांवर आली असतानाच रेल्वेच्या अनेक मार्गांवरील आरक्षण फुल्ल झाले आहे. सलग सुट्ट्यांमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासाचा अगोदरपासून बेत आखला आहे. त्यामुळे रेल्वे तिकिटाचे वेटिंग १०० च्या पुढे गेले आहे. अनेकांनी खासगी वाहनंही बुकिंग करून ठेवली आहेत. पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी अन कामानिमित्त बाहेरगावी असलेले अनेक लोक मूळगावी येत असल्याने दिवाळीत रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे.
(हेही वाचा – “तुझ्या सुपाऱ्याही काही काम करू शकल्या नाही”, नारायण राणेंचा संयम सुटला अन् …)
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. त्यातच सर्वकाही सुरळीत सुरू झाल्याने सर्वत्र आनंद, उत्साह व समाधान दिसून येत आहे. त्यातच अनेक कंपन्यांना चांगला फायदा होत असल्याने अनेकांच्या वेतनातही चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांनी पर्यटनासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वेचे वेटिंग लिस्ट वाढत आहे.
सोलापूरहून दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, कोल्हापूर अशा मोठमोठ्या शहरांना जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट आताच बुकिंग करून ठेवा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community