कोविड रुग्ण वाढीची लांब उडी : दिवसभरात १५ हजार रुग्ण

97

कोविड बाधित रुग्णांची संख्या आजवर दीड ते दोन हजाराने वाढत असतानाच बुधवारी या रुग्ण वाढीने लांब उडी घेतली आहे. दिवसभरात मंगळवारी जिथे १० हजार ८६० नवीन रुग्ण आढळून होते, तिथे बुधवारी १५ हजार १६६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. या रुग्णांपैकी १ हजार २१८ रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी केवळ ८० रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे.

रुग्ण दुपटीचा दर ८९ दिवसांवर

मंगळवारी ४९ हजार ६६१ कोविड चाचण्या केल्यानंतर १० हजार ८६० रुग्ण आढळून आले होते, तिथे ६० हजार ०१४ चाचण्या केल्यानंतर १५ हजार १६६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे तिन्ही रुग्ण दीर्घकालीन आजारी होते. यामध्ये १ रुग्ण पुरुष आणि दोन महिला रुग्णांचा समावेश आहेत. यातील दोन रुग्णांचे वय साठी पार असून एका रुग्णाचे वय हे ४० ते ६० वयोगटातील आहेत. याशिवाय दिवसभरात ७१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ५ हजार १०४ रुग्ण उपचार घेत असून सक्रिय रुग्णांची संख्या ६१ हजार ३८४ एवढी आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा ८९ दिवस एवढा आहे.

( हेही वाचा : शिवसेनेचे ठरले! ‘याच’ शिवसैनिकांना देणार उमेदवारी! )

मंगळवारी झोपडपट्यांमधील कंटेन्मेंट झोनची संख्या ही १६ एवढी होती, तर बुधवारी ही संख्या २० एवढी आहे. तर सीलबंद इमारतींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असून ३८९ वरून ४६२ एवढी झाली आहे.

दिवसभरातील रुग्ण संख्या

एकूण बाधित रुग्ण : १५ हजार १६६
बाधित पैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या : १३ हजार १९५ (८७ टक्के)
बुधवारी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण : १ हजार २१८
दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजन बेडवरील रुग्ण संख्या : ८०

एकूण दाखल रुग्ण : ५ हजार १०४
एकूण सक्रिय रुग्णांची संख्या : ६१ हजार ९२३

एकूण उपलब्ध रुग्ण खाटा :३५ हजार ४८७
रुग्ण दाखल असलेल्या खाटांची टक्केवारी : १४.४ टक्के

बरे झालेले रुग्ण : ७१४
दिवसभरातील मृत रुग्णाची संख्या: ०३

दिवसभरात केलेल्या कोविड चाचण्या : ६० हजार ०१४
कंटेन्मेंट झोपडपट्टी: २०
सीलबंद इमारती : ४६२

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.