एकादशीनिमित्त उपवासाचे पदार्थ खाल्याने पंढरपूरमधील निळोबा मठातील 137 वारक-यांना विषबाधा झाली आहे. सध्या या सर्व वारक-यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या सर्व वारक-यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी माघी एकादशी होती, त्यानिमित्ताने उपवासाचे पदार्थ खाल्याने 137 वारक-यांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे.
सर्व वारक-यांची प्रकृती स्थिर
माघी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूरात जवळपास पाच लाखांहून अधिक भाविक आले होते. संध्याकाळी निळोबा मठात उपवासाचे पदार्थ खाल्याने 137 वारक-यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर या सर्व वारक-यांना पंढरपूरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवार रात्रीपासूनच या सर्व वारक-यांवर उपचार सुरु आहेत. सध्या वारक-यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डाॅक्टरांकडून देण्यात आली आहे.
( हेही वाचा: Nashik Gradute Election Result: निकालापूर्वीच सत्यजित तांबेंचा विजय जाहीर; पुण्यात झळकले अभिनंदनाचे पोस्टर )
Join Our WhatsApp Community