ऐकावं ते नवलच! केबल चोरीनेही मंदावतोय मध्य रेल्वेचा वेग

95

मध्य रेल्वेच्या सिग्नल केबल चोरीच्या वाढत्या घटमेमुळे मध्य रेल्वे प्रशासन हैराण झाले आहेत. सिग्नल केबल चोरीच्या घटनेमुळे मागील चार वर्षांत २२ हजार तास मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय सेवेला विलंब झाल्याचे समोर आली आहे. या चोरीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा बलाला गस्त वाढवण्याचे आणि संबंधित गुन्हेगाराचा शोध घेण्याचे आदेश दिले आहे.

आठ महिन्यांत १६ सिग्नल केबल चोरीच्या घटना 

मुंबईच्या मध्य उपनगरीय रेल्वेच्या मुंबई आणि मुंबई बाहेरील रेल्वे मार्गावर सिग्नल केबल चोरीच्या घटना घडत आहे. या घटनांमुळे रेल्वे उपनगरीय ट्रेनचे वेळापत्रक बिघडत आहे, याचा थेट फटका प्रवासी आणि रेल्वे प्रशासनाला बसत आहे. मागील एप्रिल ते डिसेंबर या आठ महिन्यांत मुंबई सीएसएमटी ते कसारा आणि पनवेल ते सीएसएमटी दरम्यान १६ सिग्नल केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत. सिग्नल आणि ट्रॅक केबलोचोरी ही जागतिक समस्या आहे, ज्यामुळे गेल्या चार वर्षांत प्रवाशांना सुमारे २२ हजार तासांचा विलंब झाला आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केबल्स चोरीला गेल्यावर रेल्वे नेटवर्कची सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन यंत्रणा काम करत नाही. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होते, त्यामुळे रेल्वे वेळापत्रकावर त्याचा थेट परिमाण होतो असेही अधिकारी यांनी म्हटले आहे. चोरीचे ठिकाण सापडेपर्यंत आणि ट्रॅक निश्चित होईपर्यंत रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिमाण होतो.

(हेही वाचा मनसेचं सेना भवनासमोर ‘गर्व से कहो हम…’ आणि औरंगाबादेत ‘जय श्री राम’!)

तांब्याच्या तारांना बाजारभाव अधिक 

चोरटे १०० मीटर ते १५० मीटर लांबीच्या केबल्स कापून त्यांची विक्री करतात, मात्र अर्धवट चोरी केलेल्या केबल्सला मध्येच जोडता येत नसल्यामुळे रेल्वेला ९०० मीटर ते दीड किलो मीटरपर्यंत सिग्नल केबल्स बदलावे लागते. सिग्नल केबलमध्ये तांब्याच्या तारा असल्यामुळे तांब्याचा बाजारात अधिक भाव असल्यामुळे चोराच्या टार्गेट सिग्नल केबल असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली. केबल्स चोरीच्या घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आणि अधिक सतर्कतेची गरज आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यानी सांगितले.

सिग्नल केबल चोरीच्या घटना

  • १३ एप्रिल: कसारा – एका अज्ञात व्यक्तीने केबल कापून चोरी केली ज्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
  • ९ जुलै: आटगाव – कॉपर ट्रॅकची लीड वायर कापून चोरी झाली
  • १२ जुलै: वडाळा – आठ मीटर ट्रॅकच्या लीड वायर आणि सेन्सरशी छेडछाड करण्यात आली.
  • ८ डिसेंबर: टिटवाळा – बारा सिग्नलिंग केबल्स कापून चोरीला गेले. टिटवाळा येथे पहाटे २:३० वाजता ही घटना घडली, ज्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील तीन सिग्नल बिघाड झाल्याच्या घटना घडल्या.
  • उंबरमाळी, कसारा, मानसरोवर, जासई यार्ड, खांदेश्वर, नागोठणे, कमान रोड, भिवपुरी रोड, आटगाव, खर्डी, थानसीट, कर्जत आणि रौली जंक्शन या ठिकाणी चोरटे १००ते १५० मीटर केबल्सची चोरी सहसा करतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.